मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लोकप्रिय गायक Arijit Singh च्या आईचं कोरोनानं निधन; कोलकात्यात अखेरचा श्वास

लोकप्रिय गायक Arijit Singh च्या आईचं कोरोनानं निधन; कोलकात्यात अखेरचा श्वास

अरिजीतच्या आईला दुर्मीळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची उपचारादरम्यान आवश्यकता होती. यासाठी कोलकात्यातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं.

अरिजीतच्या आईला दुर्मीळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची उपचारादरम्यान आवश्यकता होती. यासाठी कोलकात्यातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं.

अरिजीतच्या आईला दुर्मीळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची उपचारादरम्यान आवश्यकता होती. यासाठी कोलकात्यातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं.

    कोलकाता, 20 मे: प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या (Arijit Singh) आईचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी त्या कोलकात्याच्या एका रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तिथे त्यांची तब्येत ढासळली. गुरुवारी सकाळी 11 वाजताच त्यांचं निधन झालं. नव्या पिढीचा हा लोकप्रिय गायक आईविषयी खूप हळवा होता.

    बंगाली अभिनेत्री स्वस्तिकाने अरिजीतच्या आईविषयी पोस्ट केली होती. अरिजीतच्या आईला दुर्मीळ असलेल्या A निगेटिव्ह रक्ताची उपचारादरम्यान आवश्यकता होती. यासाठी कोलकात्यातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं. बंगाली फिल्म मेकर श्रीजित मुखर्जी यांनीसुद्धा अरिजीतच्या आईसाठी मदतीचं आवाहन केलं होतं.

    सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट लवकरच येतोय; 'दिठी'चा ट्रेलर प्रदर्शित

    कलाकारांच्या Tweet ला प्रतिसादही मिळाला होता. पण अखेर अरिजीतच्या आईची कोरोनाविरुद्धतची लढत अपयशी ठरली. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    अरिजीत सिंग 2005 पासून चित्रपटसृष्टीसाठी गात आहे. त्याचा रिअॅलिटी शोमधला सहभागही गाजला होता. आशिकी 2 नंतर अरिजीतचं नाव खऱ्या अर्थाने लोकप्रिय झालं.

    ‘कितीही पळ शक्तिमान आता तुला सोडणार नाही’; मुकेश खन्ना ट्रोलर्सवर संतापले

    पश्चिम बंगामध्ये निवडणुकीनंतर कोरोनाचा कहर झाल्याचं स्पष्ट होत आहे. गेल्या 24 तासांत या राज्यात कोरोना बळींचा उच्चांकी आकडा समोर आला आहे. बुधवारी दिवसभरात 157 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचं आकडे सांगतात. 19 हजारांवर नवे कोरोना रुग्ण 24 तासांत सापडले आहेत.

    First published:

    Tags: Bollywood, Breaking News, Coronavirus