मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट लवकरच येतोय; डोळ्यात पाणी आणणारा 'दिठी'चा ट्रेलर प्रदर्शित

सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट लवकरच येतोय; डोळ्यात पाणी आणणारा 'दिठी'चा ट्रेलर प्रदर्शित

(Dithee)आपल्या हातच्या पोराला गमावलेल्या बापाची खिन्न करणारी ही कथा आहे.

(Dithee)आपल्या हातच्या पोराला गमावलेल्या बापाची खिन्न करणारी ही कथा आहे.

(Dithee)आपल्या हातच्या पोराला गमावलेल्या बापाची खिन्न करणारी ही कथा आहे.

मुंबई, 20 मे-  मराठी चित्रपट (Marathi Industry) सृष्टीत अनेक उत्कृष्ट चित्रपट आहेत. अनेक चित्रपटांनी आपल्या हळव्या कथेने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. असाच एक चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. ‘दिठी’ (Dithee) असं या चित्रपटाचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे (Late Sumitra Bhave)  यांचा शेवटचा चित्रपट आहे.

नुकताच सोशल मीडियावर ‘दिठी’ यामराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहून अनेकांचे डोळे पाणावले. कारण ही कथाच तिथकी मार्मिक आहे. ही कथा एक अशा बापावर आधारित आहे. जो आपल्या मुलाच्या आकस्मिक मृत्यूमुळे पुरता हादरून जातो. मुलाच्या जाण्याने त्याला येणारे अनुभव यामध्ये चित्रित करण्यात आले आहेत. हा बाप एक सर्वसामान्य लोहार काम करत असतो. हातावरचं पोट असतं तरीही हसत खेळत उदरनिर्वाह चालू असतो. मात्र मुलाच्या मृत्यूने त्याच्या आयुष्यालाचं खीळ बसते.

धोधो पडणारा पाऊस, खेड्यातली चार जाणती माणसे, पुरात वाहून गेलेला मुलगा आणि 30 वर्षे विठ्ठलाची सेवा करणारा बाप आणि त्याचा विश्वास अशी एकंदरीत ही कथा आहे. यामध्ये किशोर कदम, मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष अशी तगडी कलाकार मंडळी आहे. या कलाकारांचा इतक्या वर्षांच्या अभिनयाचा अनुभव या चित्रपटात स्पष्ट दिसून येतो.

(हे वाचा: श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनाने घेतला दोन जवळच्या व्यक्तींचा बळी)

‘दिठी’ हा चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचा शेवटचा चित्रपट ठरला. 19 एप्रिल 2021 म्हणजे गेल्याच महिन्यात त्यांचं निधन झालं. सुमित्राजींनी मराठी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. ‘दिठी’ हा चित्रपट दि. बा. मोकाशींच्या एका कथेवर आधारित आहे. इतर चित्रपटांना प्रमाणेच सुमित्राजींनी ‘दिठी’ सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी सर्वांनाचं आशा आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment