मुंबई 20 मे**:** शक्तिमान (Shaktimaan) या लोकप्रिय सुपरहिरो मालिकेतून नावारुपास आलेले मुकेश खन्ना (Mukesh Khanna) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. देशभरात घडणाऱ्या विविघ घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात. अनेकदा यामुळं त्यांना ट्रोल देखील केलं जातं. मात्र यावेळी काही ट्रोलर्सनं चक्क कोरोनामुळं त्यांचा मृत्यू झाला अशा अफवा पसरवल्या होत्या. परिणामी देशभरातील चाहत्यांनी त्यांच्या नावानं श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. या प्रकरामुळं मुकेश खन्ना संतापले आहेत. माझ्या मृत्यूची बातमी पसरवणाऱ्याला मी सोडणार नाही असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला आहे**. (Mukesh Khanna Angry reply to trollers)** मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य करत आपला संताप व्यक्त केला. ‘ती चांगली आई आहे, मात्र…’; श्वेता- अभिनवच्या वादात राजा चौधरीची उडी, घटस्फोटित पत्नीवर ओढले ताशेरे
…अन् सेटच गेला उडून; चक्रीवादळामुळं सलमान खानचं कोट्यवधींचं नुकसान “नुकतंच माझ्या बहिणीचं कोरोनामुळं निधन झालं. त्यामुळं मी शांत बसलो होतो. तुमच्या या माकडचेष्टांकडे दुर्लक्ष करत होतो. परंतु पाणी आता डोक्याच्या वर गेलं आहे. आता मी शांत बसणार नाही. एखाद्या जिवंत माणासाच्या मृत्यूची बातमी देताना तुम्हाला लाज वाटत नाही का? काही व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही कोणालाही मारणार का? पण आता मी खोट्या बातम्या पसरवणाऱ्याला शोधून काढणार आहे. त्याच्यावर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल. जेणेकरुन माझ्याबाबतीत जे घडलं ते इतर कुणाच्या बाबतीत घडणार नाही.” असं म्हणत मुकेश खन्न यांनी त्या ट्रोलर्सला धमकीवजा इशारा दिला आहे. कोरोनामुळं मुकेश खन्ना यांच्या बहिणीचं नुकतंच निधन झालं. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही दुखद बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. ‘काल कित्येक तास मी माझ्या निधनाच्या अफवा खोट्या असल्याचे सांगण्यासाठी संघर्ष करत होतो. पण तेव्हा मला कल्पनाही नव्हती की एक भंयकर सत्या माझ्या डोक्यावर रेंगाळत आहे. आज माझ्या एकुलत्या एक बहिणीचे दिल्लीमध्ये निधन झाले. तिच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. 12 दिवसांमध्ये करोनावर मात केल्यानंतर तिचे निधन झालं’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली होती. मात्र त्यानंतर त्यांच्या देखील निधनाच्या बातम्या जोर धरु लागल्या. अखेर आता त्या ट्रोलर्सला पकडण्याचा निश्चय शक्तिमाननं केला आहे.

)







