जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती गंभीर; सुपरस्टार अभिनेत्री करतेय रक्ताची मागणी

अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती गंभीर; सुपरस्टार अभिनेत्री करतेय रक्ताची मागणी

अरिजीत सिंहच्या आईची प्रकृती गंभीर; सुपरस्टार अभिनेत्री करतेय रक्ताची मागणी

‘दिल बेचारा’(Dil Bechara) फेम अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल(Swastika Mukharjee) मीडियावर पोस्ट लिहित, रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 मे- कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) आज प्रत्येक व्यक्ती संकटात सापडली आहे. बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक(Bollywood Singer) अरिजीत सिंगलासुद्धा (Arijit Singh) मदतीची गरज आहे. सध्या अरिजीत सिंगच्या(Arijit mother in critical condition) आईची तब्येत खुपचं गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आणि त्यांना लवकरात लवकर रक्ताची गरज आहे. त्यामुळे ‘दिल बेचारा’(Dil Bechara) फेम अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने सोशल(Swastika Mukharjee) मीडियावर पोस्ट लिहित, रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. तिची ही पोस्ट मोठ्या प्रमाणत व्हायरल होतं आहे. आणि अरिजीतचे चाहतेसुद्धा रक्तदान करण्याचं आवाहन करत आहेत.

जाहिरात

अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक तातडीची पोस्ट लिहित, रक्तदानाचं आवाहन केलं आहे. यामध्ये तिनं म्हटलं आहे, ‘गायक अरिजीत सिंग यांच्या आईसाठी ‘ए’ निगेटिव्ह रक्ताची तात्काळ गरज आहे. त्या सध्या अमरी डकूरियाच्या रुग्णालयात दाखल आहेत. शक्य असणाऱ्या पुरुष रक्तदात्यांनी स्वातीशी संपर्क साधा.’ या पोस्ट नंतर चाहते मोठ्या प्रमाणात प्रश्न करत आहेत. काहींना प्रश्न पडला आहे की फक्त पुरुष रक्तदातेचं का? तर काहींनी विचारलंय कोणत्या अजारणे त्रस्त आहेत? स्वस्तिका मुखर्जीसोबतचं दिग्दर्शक श्रीजित मुखर्जी यांनी सुद्धा बंगाली भाषेत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. (हे वाचा: गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान  ) पोस्ट करत श्रीजित मुखर्जी यांनी म्हटलं आहे, ‘या कठीण प्रसंगात अरिजीतची मदत करा, यासोबतचं श्रीजित यांनी एक फोन नंबरसुद्धा शेयर केला आहे. (हे वाचा: सलमान खानचा मोठा निर्णय; ‘राधे’ची कमाई खर्च करणार कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी  ) मात्र अजूनसुद्धा हे स्पष्ट नाही झालं की, अरिजीत सिंग यांच्या आई कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहून अंदाज लावण्यात येत आहे, की त्यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली असेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात