मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सलमान खानचा मोठा निर्णय; ‘राधे’ची कमाई खर्च करणार कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी

सलमान खानचा मोठा निर्णय; ‘राधे’ची कमाई खर्च करणार कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी

Most Awaited ‘राधे’ची रिलीज डेट ठरली

Most Awaited ‘राधे’ची रिलीज डेट ठरली

‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted bhai) ची कमाई ही कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी जाणार आहे. नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची घोषणा केली आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 6 मे: कोरोनाचा प्रकोप (corona virus) हा संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. दिवसागणिक परिस्थिती खालावत चालली आहे. वैद्यकिय सुविधांचा अभाव जाणवत आहे. अशात अनेकजन मदतीचा हात पुढे करत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही मदतीसाठी पुढे येत आहेत. अभिनेता सलमान खान (Salman Khan) ही निरनिराळ्या प्रकारे गरजूंची मदत करत आहे. तर आता त्याचा आगामी चित्रपट ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe : Your Most Wanted bhai) ची कमाई ही देखिल कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी जाणार आहे. नुकतीच चित्रपटाच्या निर्मात्यांनी याची घोषणा केली आहे.

निर्मात्यांच्या मते ‘सध्या देश एका वाईट परिस्थितीतून जात आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून कोविड 19 (covid 19) शी लढण्यासाठी सगळ्यांनीच एक पाऊल पुढे आलं पाहिजे. आम्ही फक्त प्रेक्षकांच असाधराण मनोरंजन करण्यावर विश्वास ठेवत नाही तर देशात सकारात्मक बदल घडवण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहेकी राधे चित्रपटाच्या कमाईतून कोरोनग्रस्तांना त्यांच्या उपचारांसाठी मदत होईल.’

सलमान खान फिल्म्स (SKF) आणि झी स्टुडिओज (Zee studious) ने मिळून या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. तर दोन्ही कंपन्यांनी आम्ही लोकांची मदत करण्यासाठी तत्पर आहेत असं म्हटलं आहे. सलमान खान फिल्म्सच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, ‘आम्ही या महान क्षणाचे भागीदार होण्यासाठी उत्सुक आहेत ज्यातून कोरोना व्हयरस शी लढण्यासाठी आम्ही थोडफार योगदान देऊ शकू.’

करण जोहर हटवणार नेपोटिझम टॅग, कार्तिक आर्यन नंतर जान्हवी कपूर चित्रपटातून बाहेर?

 सलमानचा हा आगामी चित्रपट येत्या ईद ला म्हणजेच 13 मे ला ओटीटी (OTT) तसेच जगभरात विविध प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani), जॅकी श्रॉफ (Jacky Shroff), रणदीप हुडा (Randeep Hooda) यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

First published:

Tags: Bollywood, Entertainment, Salman khan