मुंबई, 22 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणाचा तपास तेव्हा एका वेगळ्या वळणावर गेला, जेव्हा महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि रिया चक्रवर्तीमधील WhatsApp चॅटचा स्क्रीनशॉट समोर आल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान सोशल मीडियावर रिया आणि महेश यांच्या संबंधांबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. सुशांतच्या मृत्यूआधी देखील रिया आणि महेश भट्ट यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी रिया स्वत: त्या दोघांच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलली होती, तेव्हा याबाबत अधिक चर्चा सुरू झाली होती.
रिया आणि महेश यांच्यामध्ये 2018 पासून चांगले बाँडिंग आहे. एका मुलाखतीमध्ये रियाने तिच्या आयुष्यातील महेश भट्ट यांचे महत्त्व जाहीरपणे बोलून दाखवले होते. एका मीडिया अहवालानुसार सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती खूप त्रस्त होती. तिने असे स्पष्ट केले होते की महेश आणि तिच्यामध्ये बापलेकीचे नाते आहे आणि ती त्यांना एक mentor म्हणून पाहते. तिने असे देखील म्हटले होते की, महेश एकमेव असे व्यक्ती आहेत जे एखाद्याच्या चेहऱ्ंयावरील बुरखा उतरवू शकतात. त्यांच्या प्रेमाने तिचे आयुष्य बदलले असल्याचेही रिया म्हणाली होती.
(हे वाचा-सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टबाबत शंका वाढल्या; अहवालात वेळेचा रकाना रिकामा का?)
गेल्यावर्षी 2019 मध्ये महेश भट्ट यांच्या वाढदिवशी तिने त्यांच्याबरोबरचे काही अनसीन फोटो शेअर केले होते आणि त्यांना वाढगदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने असे लिहिले होते की, 'माझ्या बुद्धा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर तुम्ही मला प्रेमाने सांभाळले, तुम्ही मला प्रेम दिले'. रियाच्या या पोस्टनंतर ती ट्रोल झाल्याने तिने ही पोस्ट डिलीट केली होती.
यानंतर तिने आणखी एक पोस्ट शेअर केली होती,ज्यामध्ये तिने 'अमर प्रेम'च्या एका गाण्यातील काही ओळी देखील लिहिल्या होत्या-' तू कौन है, तेरा नाम है क्या? सीता भी यहां बदानम हुई'.
(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूआधी काही तास रियाने महेश भट्ट यांना केला होता हा मेसेज)
रियाने 'जलेबी' या चित्रपटात महेश भट्ट यांच्याबरोबर काम केले आहे. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.