Home /News /entertainment /

सुशांतच्या मृत्यूआधी काही तास रियाने महेश भट्ट यांना केला होता हा मेसेज, WhatsApp चॅटमधून खुलासा

सुशांतच्या मृत्यूआधी काही तास रियाने महेश भट्ट यांना केला होता हा मेसेज, WhatsApp चॅटमधून खुलासा

काही दिवसांपूर्वी महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीमधील 8 जून रोजीच्या चॅटचा स्क्रीनशॉट समोर आला होता. ज्यादिवशी अभिनेत्रीने सुशांतचे घर सोडले होते. आता पुन्हा एकदा त्यांचे 9 ते 15 जूनदरम्यानचे चॅट समोर आले आहे.

    मुंबई, 22 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी (Sushant Singh Rajput Death) रोज नवे खुलासे होत आहेत.काही दिवसांपूर्वी फिल्ममेकर महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीमधील (Rhea Chakraborty) 8 जून रोजीच्या चॅटचा स्क्रीनशॉट समोर आला होता. ज्यादिवशी अभिनेत्रीने सुशांतचे घर सोडले होते. आता पुन्हा एकदा त्यांचे 9  ते 15 जूनदरम्यानचे चॅट समोर आले आहे. ज्यामध्ये रियाने महेश भट्ट यांना मेसेज केला आहे की, 'मी तुमच्याशिवाय काय करेन, एंजल. आय लव्ह यू सर तुम्ही पुन्हा एकदा मला वाचवले'. यासंर्भातील वृत्त आज तकने दिले आहे. यावर रिप्लाय करताना महेश भट यांनी हार्ट इमोजी वापरलं आहे. 10 जून रोजी महेश भट्ट यांनी रियाला एक फोटो फॉरवर्ड केला होता. या मीडिया अहवालानुसार महेश भट्ट रियाला मोटिव्हेशनल कोट्स पाठवत असत. त्याचप्रमाणे रियाने देखील त्यांना हे मेसेज करण्याबाबत सांगितले होते, ज्यामुळे तिला एनर्जी मिळते. (हे वाचा-सुशांत प्रकरणी कंगना चुकीची, पद्मश्री परत करावा; आदित्य पांचोलीने साधला निशाणा) सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी 14 जून रोजी देखील त्यांच्यामध्ये संभाषण झाल्याचे समोर येत आहे. यादिवशी सकाळी देखील महेश भट्ट यांनी तिला मॉर्निंग कोट पाठवला होता, त्यावर रियाने 'लव्ह यू सर, माय एंजल', असा मेसेज केला होता. त्यानंतर दुपारी 2.35 वाजता महेश भट्ट यांनी रियाला 'कॉल मी' असा मेसेज केला होता. ज्यावेळी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची बातमी वेगाने सर्वत्र पसरली होती. (हे वाचा-हत्या की आत्महत्या? सुशांतच्या शरीरावरच्या जखमांचा अभ्यास करणार AIIMSचे तज्ज्ञ) या मीडिया अहवालानुसार 8 जून रोजी रियाने महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅप केला होता. या चॅटिंगमध्ये रियाने मूव्ह ऑन झाल्याचं लिहिलं आहे. ती पुढे लिहिते की, जड अंतकरणाने मी पुढे जात आहे..रियाने पहिला मेसेज आयशा मूव्ह ऑन असा केला आहे. जिलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्तीच्या भूमिकेचं नाव आयशा आहे.  रियाच्या मेसेजवर महेश भट्ट यांनी तुझे वडील या निर्णयाने खूश होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय महेश भट्ट यांनी पुढे लिहिलं की,आता मागे वळून पाहू नकोस. दरम्यान हे प्रकरण आता सीबीआय हाताळत आहे. सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लवकरच लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी रियाची देखील सीबीआय चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या