मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टबाबत शंका वाढल्या; अहवालात वेळेचा रकाना रिकामा का? AIIMSच्या डॉक्टरांचा सवाल

सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टबाबत शंका वाढल्या; अहवालात वेळेचा रकाना रिकामा का? AIIMSच्या डॉक्टरांचा सवाल

या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता असरानी आणि सुधा चंद्रन देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

या सिनेमात प्रसिद्ध अभिनेता असरानी आणि सुधा चंद्रन देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयने सुरु केल्याने अनेक गोष्टी बाहेर येत आहेत.

मुंबई, 22 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput ) पोस्टमार्टम अहवालाचा तपास करण्यासाठी सीबीआयने नियुक्त केलेल्या फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि AIIMS चे डॉक्टर सुधीर गुप्ता (Dr Sudhir Gupta) यांनी सुशांतच्या पोस्टमार्टम अहवालाबाबत शंका उपस्थित केली आहे. डॉ सुधीर गुप्तांनी असे म्हटले आहे की, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये टाइम स्टँप नाही आहे. आजतकशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांमी असे म्हटले आहे की, ही एक गंभीर बाब आहे. पोलिसांना याबाबत डॉक्टरांना प्रश्न विचारणे आवश्यक होते की वेळेचा कॉलम रिकामा का आहे. मात्र पोलिसांनी असे केले नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर गुप्ता यांनी दिली आहे.

मीडिया अहवालात असे नमुद करण्यात आले आहे की, या पोस्टमार्टम अहवालाचा संपूर्ण तपास करण्यासाठी त्यांना 3 ते 4 दिवसांचा कालावधी जाणार आहे. पोस्टमार्टम अहवालात वेळेचा रकाना रिकामा असण्याबाबत ते मुंबईतील डॉक्टरांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यानंतर याबाबत विस्तारित प्रतिक्रिया दिली जाईल.

(हे वाचा-सुशांतच्या मृत्यूआधी काही तास रियाने महेश भट्ट यांना केला होता हा मेसेज)

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयने सुरु केल्याने अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. या प्रकरणी अनेक शंका उपस्थित केल्या जात असल्याने चर्चेला दररोज नवं वळण मिळत आहे. सुशांतच्या पोस्ट मार्टेम रिपोर्टबद्दल शंका उपस्थित झाल्याने आता AIIMSची फॉरेन्सक टीम त्याच्या शरीरावरच्या जखमांचा आणि इतर गोष्टींचा अभ्यास करणार असून त्याचा अहवाल सीबीआयला देणार आहे. ही आत्महत्या असेल की हत्या याबाबतही ही टीम आपलं मत व्यक्त करणार असल्याने या टीमचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरणार आहे.

(हे वाचा-सुशांच्या मृतदेहाचं अंत्यदर्शन घेताना रिया का म्हणाली... 'सॉरी बाबू')

सीबीआयने यासंदर्भात AIIMSला विनंती केली होती. त्यानुसार AIIMSच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडे असलेली कागदपत्र आणि सर्व रिपोर्ट्स यांचा अभ्यास करून ही समिती आपला रिपोर्ट देणार आहे.

संपादन-जान्हवी भाटकर

First published:
top videos