मुंबई, 05 मे : कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. तर दुसरीकडे मृतकांचा आकडा वाढत आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रेटीपर्यंत कोरोना सर्वांचाच बळी घेत आहे. 2020 प्रमाणेचं 2021 सुद्धा बॉलिवूडमध्ये हाहाकार माजवत आहे. यावर्षीसुद्धा अनेक कलाकारांनी जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडला (Bollywood) पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. फिल्म एडिटर (Film Editor) अजय शर्मा (Ajay Sharma Death) याचं कोरोनाने नुकतंच निधन झालं आहे.
अजय शर्मा अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘रश्मी रॉकेट’चा एडिटर होता. सध्या तो त्या चित्रपटासाठी काम करत होता. मात्र त्याची कोरोनामुळे तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अजय शर्मा गेली अनेक दिवस कोरोनाशी झुंज देत होता.
The film industry has lost yet another young brilliant editor to COVID. Ajay Sharma, editor of 'Ludo' and 'Jagga Jasoos' & has worked as an associate editor in various hit films like Kai po chhe . Heartfelt condolences to his family & near ones . ॐ शान्ति ! 🙏 pic.twitter.com/ckvVPgPZY5
— Ashoke Pandit (@ashokepandit) May 5, 2021
त्याचा ऑक्सिजन लेव्हल 83 वर पोहोचला होता. 10 दिवसांपूर्वीच फिल्म निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरवर अजय शर्मासाठी ऑक्सिजन बेडची मागणी केली होती. पण त्याची ही झुंज अपयशी ठरली. अजय याचा कोरोनामुळे मृत्यू झाला याबाबत त्यांच्या एका जवळच्या मित्रानेच माहिती दिली.
(हे वाचा - धक्कादायक! कोरोना बळींचं सत्र सुरूचं, 'बापमाणूस' फेम अभिलाषा पाटीलचं निधन...)
अजय शर्माच्या निधनाची बातमी ऐकून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी ट्वीट करत अजयला श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच अजयसारख्या उत्कृष्ट एडिटरला गमावणं ही बॉलिवूडची फार मोठी हानी असल्याचंदेखील म्हटलं आहे.
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने ट्वीट करत म्हटलं आहे, "मी पूर्णपणे तुटून गेले, आज आम्ही अजय शर्मांना गमावलं आहे. ते फक्त एक उत्तम एडिटर नव्हते. तर एखाद्या हिऱ्यासारखे माणूस होते. हे योग्य नाही झालं." तर निखील तनेजाने म्हटलं आहे, "जेव्हापासून ही माहिती समजली आहे. मी पूर्णपणे हादरलो आहे. कित्येकांना यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे"
(हे वाचा - मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला बळी )
अजय शर्माने जग्गा जासूस, लुडो, कारवां, इंदू की जवानी, प्यार का पंचनामा 2, तुम मिले, हायजॅक या चित्रपटांचं एडिटिंग केलं आहे. तसंच ‘बंदिश’ या चर्चित वेब सीरिजचंसुद्धा एडिटिंग केलं आहे. तर बर्फी, ये जवानी है दिवानी, अग्निपथ सारख्या प्रसिद्ध चित्रपटात असिस्टंट एडिटर म्हणून काम केलं आहे. 1995 मध्ये त्यांनी ‘जॉली’ या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला पुन्हा एक मोठा धक्का लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.