मुंबई, 05 मे: कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोकं असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक कलाकरांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आणखी एक दु:खद माहिती समोर आली आहे. ‘बापमाणूस’ (Bapmanus) या मराठी मालिकेतील अष्टपैलू कलाकार अभिलाषा पाटील (Abhilasha Patil) यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
अभिलाषा पाटील या मराठी मधील एक अष्टपैलू कलाकार होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठी मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली आहे.
(हे वाचा:बॉलिवूडमध्ये कोरोनाचं थैमान! एकाच दिवशी दोन अभिनेत्रींनी आपल्या भावाला गमावलं)
मराठीतील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘बापमाणूस’ मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला होता. यामध्ये त्यांनी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी बायको देता का बायको, प्रवास यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. अभिनेत्री पल्लवी पाटीलने देखील अभिलाषा यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.
(हे वाचा:आता मृत्यू जवळ येतोय..'कोरोना स्थितीबाबत ज्येष्ठ अभिनेत्याने व्यक्त केली चिंता )
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा विळखा वाढला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व शुटींग बंद करण्यात आल्या आहेत. आणि म्हणूच कलाकार शुटींग साठी परराज्यात गेले आहेत. त्याप्रमाणेच अभिलाषा सुद्धा शुटींगच्या निमित्ताने बनारसला गेल्या होत्या. मात्र तिथे त्यांची प्रकृती बिघडली होती. म्हणून त्यांनी परत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये येऊन त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. आणि त्यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यांनतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या चार दिवस ICU मध्ये सुद्धा होत्या. मात्र अखेर त्यांचा कोरोनाशी लढा अपयशी ठरला. काळ त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.