Home /News /entertainment /

मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला बळी

मनोरंजनसृष्टीला पुन्हा मोठा धक्का; आता अभिनेत्याच्या भावाचा कोरोनाने घेतला बळी

‘नामकरण ’(Naamkaran) फेम अभिनेता जैन इमाम (Zain Imam) याच्या भावाचंसुद्धा कोरोनामुळे निधन झालं आहे.

  मुंबई, 05 मे : कोरोनाचा विळखा (Coronavirus) दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा सेलेब्रेटी कोणाचीच यामधून सुटका नसल्याचं दिसत आहे. एकीकडे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. तर दुसरीकडे मृतांचा आकडा वाढत आहे. कोरोना महासाथीमध्ये अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी जगाचा निरोप घेतला आहे. कालच बिग बॉस (Bigg Boss) फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अभिनेत्री पिया वाजपेयी (Pia Bajpie) यांच्या भावांचा कोरोनाने बळी घेतला होता. कलाकार त्यातून सावरलेही नसतील तोपर्यंत अजून एक धक्का त्यांना बसला आहे. नुकताच ‘नामकरण’ (Naamkaran)  फेम अभिनेता जैन इमाम (Zain Imam) याच्या भावाचंसुद्धा कोरोनामुळे निधन झालं आहे.
  जैन इमामने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने आपल्या भावाच्या निधनाची दु:खद बातमी दिली आहे. त्यासोबतच त्याने आपल्या भावासोबत काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत जैननं सांगितलं, "कोरोनामुळे माझ्या चुलत भावाने या जगाचा निरोप घेतला आहे. तो आमच्या सर्वांमध्ये मोठा भाऊ होता. (हे वाचा - धक्कादायक! कोरोना बळींचं सत्र सुरूचं, 'बापमाणूस' फेम अभिलाषा पाटीलचं निधन...  ) जैन भावुक होत म्हणतो, "आम्हा सर्व भावंडांमध्ये कुक्कु भाऊ (सईद ताकी इमाम) सर्वात मोठा होता. आम्ही सर्वजण त्याला प्रेमाने कुक्कु असं म्हणत असे. त्याने आमच्या मनामध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे. त्याला आमच्या सगळ्यांकडून शेवटचा निरोप. आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर आम्हाला सोडून निघून जाशील. आम्हाला खात्री होती की तू लवकर बरा होऊन घरी परतशील मात्र देवाला काही वेगळच हवं होतं. तू प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा व्यक्ती आहेस. ही पोस्ट त्या अमूल्य आठवणींचा उजाळा आहे. ज्या तुझ्याशी निगडीत आहेत. इंडस्ट्रीने एक उत्तम कवी, लेखक आणि वक्त्याला गमावलं आहे. 10 दिवसांपूर्वीच मोठ्या आईने जगाचा निरोप घेतला होता. वाटलं होतं तू यातून लढा देऊन आमच्याकडे परत येशील, मात्र असं नाही झालं. तू नेहमीच आठवणीत राहशील" (हे वाचा - कोरोनाने हिरावले वडील, सलमान खानने घेतली 18 वर्षीय मुलाची जबाबदारी  ) चारू मलिकपासून पूजा चोप्रापर्यंत अनेक कलाकारांनी जैनला आधार देत कमेंट केल्या आहेत आणि जैनच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Corona patient, Coronavirus, Entertainment, Instagram post, Tv actor

  पुढील बातम्या