नवी दिल्ली, 20 जून : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांनी जवळपास चार दशकं बॉलिवूडवर राज्य केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा राजेंद्र कुमार यांचे सहा ते सात सिनेमे एकाच वेळी चित्रपटगृहात लागलेले राहायचे. 60 च्या दशकातील सर्वात चांगले अॅक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. तसं पाहिलं तर राजेंद्र यांनी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या काळातील प्रत्येक अभिनेत्रीसोबत त्यांनी रोमान्स केला. मात्र त्यांनी आयुष्यात कधीच अभिनेत्री गीता बालीसोबत रोमान्स केला नाही. या दोघांचे सिनेमे चित्रपटगृहात पाहिले गेले. मात्र ऑनस्क्रीन गीता यांचा प्रियकर किंवा पतीची भूमिका करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला होता.
विशेष म्हणजे राजेंद्र कुमार यांनी ‘पतंगा’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात ते सेकेंड लीड अॅक्टर होते. त्यानंतर 1955 मध्ये आलेल्या ‘वचन’ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले. राजेंद्र यांच्या चित्रपटात गीता बालीही महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटात त्या राजेंद्रची बहीण बनल्या. हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपट होता. पण, या चित्रपटानंतर राजेंद्रने पुन्हा गीता बालीसोबत पडद्यावर काम केले नाही. Nawazuddin Siddiqui: 27 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत नवाजुद्दीन सिद्दिकीचा लिपलॉक सीन; म्हणाला ‘आजची तरुण पिढी…’ …म्हणून केला नाही रोमान्स मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘वचन’ हा चित्रपट सुपरहिट होता. चित्रपटाच्या दिग्दर्शक राजश्रीने राजेंद्र आणि गीता बाली यांच्यावर रोमँटिक चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, वचन चित्रपटानंतर मी गीताला माझी बहीण मानत असल्यामुळे गीतासोबत रोमान्स करू शकत नाही, असे सांगत राजेंद्रने चित्रपट नाकारला. अशा वेळी रोमान्स करणे माझ्यासाठी शक्य नाही. वचन चित्रपटात गीता-राजेंद्रने साकारलेली भाऊ-बहिणीची भूमिका या दोघांनी खऱ्या आयुष्यातही निभावली असं म्हटलं जातं. राजेंद्र सदैव त्याचा भाऊ राहिला. सई ताम्हणकर एकटी नाही तर ‘या’ व्यक्तीसोबत फिरतेय स्पेन, इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट कपूर घराण्याची सून गीता बाली या कपूर कुटुंबातील सून होत्या. त्यांनी वयाने लहान शम्मी कपूरशी लग्न केले होते. गीता ही तिच्या काळातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक होती. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले. प्रत्येक हिरो तिच्या सौंदर्यावर फिदा होता. त्यापैकी एक शम्मी कपूर होते. पुढे गीता शम्मी कपूर यांची पत्नी बनली आणि कपूर कुटुंबाची सून होताच तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. राजेंद्रप्रमाणेच गीता यांनीही लहान वयात हे जग सोडले. 1965 मध्ये त्यांचे निधन झाले. गीता बाली ‘बदनामी’, ‘बावरे नैन’ ‘आनंद मठ’ आणि ‘जब से तुम्हे देखा है’ यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध होत्या.

)







