Home /News /news /

पार्टी करून आलेल्या महिलेला कारच्या आरशातून पाहिलं, ड्रायव्हरने तिच्याच फ्लॅटमध्ये केला बलात्कार

पार्टी करून आलेल्या महिलेला कारच्या आरशातून पाहिलं, ड्रायव्हरने तिच्याच फ्लॅटमध्ये केला बलात्कार

महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची ही घटना आहे. विशेष अधिकारी पीडितेला मदत करीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

    लंडन, 04 जानेवारी : एका टॅक्सी चालकाने पार्टीतून घरी परतणाऱ्या महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या फ्लॅटवर जाऊन बलात्कार केला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक 31 वर्षीय महिला पार्टीसाठी गेली होती. त्यादरम्यान तिने प्रचंड मद्यपान केलं होतं. अशात घरी जाता येणार नाही म्हणून पीडित महिलेच्या मित्रांनी तिच्यासाठी टॅक्सी बुक केली होती. यावेळी ट्रक्सी चालकाच्या लक्षात आलं की महिलेला शुद्ध नाही आहे. त्याचाच त्याने फायदा घेत महिलेवर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची ही घटना आहे. विशेष अधिकारी पीडितेला मदत करीत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करीत आहेत. द सनच्या वृत्तानुसार, पोलिसांनी पुष्टी केली की एका 37 वर्षीय व्यक्तीला महिलेसोबत बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बलात्काराच्या घटनेनंतर सुमारे 10 दिवसानंतर पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले. इतर बातम्या - डोंबिवलीत 66 वर्षीय वृद्ध महिलेची आत्महत्या, 7व्या मजल्यावरून घेतली उडी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा महिला पार्टीमधून निघाल्यानंतर महिला टॅक्सीद्वारे तिच्या फ्लॅटवर येत होती, तेव्हा ड्रायव्हरने तिचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने जबरदस्तीने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी महिलादेखील मद्यपान केल्यामुळे शुद्धीत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्रदीर्घ तपास आणि नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. आरोपीला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलें आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी पीडित महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    पुढील बातम्या