जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अक्षय कुमारने 'अतरंगी रे'च्या फक्त दोन आठवड्यांच्या शूटिंगसाठी घेतलं कोट्यवधीचं मानधन

अक्षय कुमारने 'अतरंगी रे'च्या फक्त दोन आठवड्यांच्या शूटिंगसाठी घेतलं कोट्यवधीचं मानधन

अक्षय कुमारने 'अतरंगी रे'च्या फक्त दोन आठवड्यांच्या शूटिंगसाठी घेतलं कोट्यवधीचं मानधन

‘अतरंगी रे’ या सिनेमाच्या 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी अक्षय कुमारने त्याच्या आधीच्या मानधनापेक्षा जवळपास दुप्पट मानधन घेतले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 जुलै : बॉलिवूड (Bollywood)चा खिलाडी अक्षय कुमार बॉलिवूडमधील त्या अभिनेत्यांपैकी आहे, जे शूटिंगसाठी भरमसाट चार्ज घेतात. 2019 मध्ये एका पाठोपाठ एक हिट सिनेमा केल्यानंतर यावर्षी देखील त्याचे अनेक प्रोजेक्ट्स लाइन अप आहेत. ‘अतरंगी रे’ या सिनेमामध्ये देखील अक्षय कुमार एकदा पुन्हा जबरदस्त अभिनय करताना दिसणार आहे. यामध्ये त्याच्याबरोबर सारा अली खान (Sara Ali Khan) आणि दाक्षिणात्य स्टार धनुष (Dhanush) स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांबरोबरही अक्षय पहिल्यांदा काम करत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत. दरम्यान अशी बातमी मिळत आहे की, या चित्रपटाच्या 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी अक्षय कुमारने त्याच्या आधीच्या मानधनापेक्षा जवळपास दुप्पट मानधन घेतले आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका स्पेशल भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या एका वृत्तानुसर अभिनेत्याने 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी 27 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा त्याचा लकी नंबर मानतो. त्यामुळे तो नेहमी मानधन घेताना 9 आकड्याशी जुळणाऱ्या संख्येचं तो मानधत घेतो. (हे वाचा- सुशांतच्या शेवटच्या सिनेमाची प्रतीक्षा संपणार,वाचा केव्हा आणि कुठे पाहू शकाल )

जाहिरात

अहवालानुसार अक्षय कुमार साधारण एका दिवसाच्या शूटिंगसाठी 1 कोटी रुपये मानधन घेतो. मात्र यावेळी त्याने ही रक्कम जवळपास दुप्पट घेतली आहे. ‘अतरंगी रे’ मध्ये दिग्दर्शकाला एका सुपरस्टारला घ्यायचे होते. याआधी त्यांनी हृतिक रोशनला या भूमिकेसाठी विचारले होते, मात्र त्याने नकार दिल्यानंतर अक्षय कुमारला विचारण्यात आले. (हे वाचा- फक्त शर्ट घालून अभिनेत्री नेहा शर्माने शेअर केला PHOTO, इंटरनेटवर पोस्ट व्हायरल ) खिलाडीकुमार एका वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 चित्रपट घेऊन येतोच. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर देखील कमालीचे हिट ठरतात. अक्षय कुमार लवकरच सूर्यवंशी’, ‘लक्ष्मी बम’, ‘बेलबॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ या सिनेमामध्ये दिसणार आहे. सूर्यवंशीमध्ये अभिनेत्री कतरिना कैफ त्याच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे तर लक्ष्मी बममध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री कियारा अडवाणी दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात