Home /News /entertainment /

Dil Bechara : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची प्रतीक्षा आज संपणार; वाचा केव्हा आणि कुठे पाहू शकाल हा सिनेमा

Dil Bechara : सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाची प्रतीक्षा आज संपणार; वाचा केव्हा आणि कुठे पाहू शकाल हा सिनेमा

सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा सिनेमा आज म्हणजे 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा याने केले आहे.

  मुंबई, 24 जुलै : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या मृत्यूला आज एक महिन्याहून जास्त काळ लोटला आहे. त्याच्या चाहत्यांना सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बाबत (Dil Bechara) खूप उत्सुकता लागून राहिली आहे. 14 जून रोजी अभिनेत्याने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेला महिनाभराचा कालावधी उलटूनही त्याचे चाहते हे सत्य स्विकारू शकले नाही आहेत. सुशांतला श्रद्धांजलीच्या स्वरुपात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे. कोरोनामुळे सिनेमागृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करणे शक्य नसल्यामुळे ओटीटीववर फिल्म प्रदर्शित होणार आहे. कधी, कुठे आणि किती वाजता प्रदर्शित होणार 'दिल बेचारा'? सुशांत सिंह राजपूतचा 'दिल बेचारा' हा सिनेमा आज म्हणजे 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाब्रा याने केले आहे. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टारवर (Disney Plus Hotstar) प्रदर्शित होणार आहे. मुकेश छाब्रा यांनी घोषणा करून अशी माहिती दिली आहे या चित्रपटाचा प्रीमियर 24 जुलै रोजी 7.30 वाजता होणार आहे. (हे वाचा-बापरे! 'बाहुबली'बरोबर एका सिनेमात काम करण्यासाठी दीपिकाने आकारले एवढे कोटी) हा सिनेमा सुशांतचा शेवटचा सिनेमा असल्या कारणाने, चाहत्यांना याबाबत खूप उत्सुकता आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सनी असा निर्णय घेतला आहे की, हा सिनेमा पाहण्यासाठी हॉटस्टारवर कोणतेही सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार नाही. म्हणजेच, ज्यांनी हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन घेतले नाही आहे ते देखील हा सिनेमा पाहू शकतात.
  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या या शेवटच्या चित्रपटाबाबत जशी चाहत्यांना उत्सुकता आहे, त्याचप्रमाणे इंडस्ट्रीतील कलाकार देखील या चित्रपटाबाबत बोलत आहेत. अनेकांनी सुशांतवरील प्रेमाखातर सिनेमाचे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. दरम्यान या सिनेमामध्ये 'संजना सांघी' (Sanjana Sanghi) ही अभिनेत्री दिसणार आहे. ट्रेलरवरून दोघांमध्ये खूप छान केमिस्ट्री जुळल्याचे दिसते आहे. सुशांतचा सिनेमा ओटीटीवरील सर्वात हिट सिनेमा करण्याचं त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर बोलले जात आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या