मुंबई, 05 नोव्हेंबर: अभिनेता मिलिंद सोमणने (Milind Soman) त्याच्या वाढदिवशी समुद्रावर धावतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. मिलिंदच्या या फोटोची विशेष चर्चा होत झाली कारण कपडे न घालताच यावेळी तो समुद्रावर धावला. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या Naked फोटोमुळे आता त्याला ट्रोलिंगची शिकार व्हावे लागत आहे. मिलिंद सोमण त्याच्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. कुणाला सांगून खरं वाटणार नाही पण मिलिंद सोमणने बुधवारी 55वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. ‘रनिंग’ हा मिलिंदच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. याबाबतीत त्याने वेळोवेळी सर्वाना प्रेरित केले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तही त्याने फिटनेस आणि रनिंगचे महत्व सांगणारी पोस्ट शेअर केली होती. त्यावर नेटिझन्सनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूनम पांडेंच्या समर्थनार्थ नेटिझन्स काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडेवर (Poonam Pandey) वर तिच्या गोवा ट्रीप दरम्यान अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगने तिच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. कैनाकोना पोलीस ठाण्यातही एका अज्ञाताने एक एफआयर दाखल केली आहे. (हे वाचा- आयुष्मान खुरानाने केली किंग खान शाहरुखची कॉपी, VIDEO पाहून चाहते म्हणाले…) अभिनेत्री पूनम पांडेला (poonam pandey) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका व्हिडीओमुळे (video) पूनम पांडेला अटक करण्यात आली आहे. गोव्यात (goa) शूट केलेला तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी विरोधी पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठल्यानंतर आज गोवा पोलिसांनी (goa police) पूनम पांडेला अटक केली आहे. (हे वाचा- ‘गुडूडू’ नाही हे पात्र साकारण्याची होती ऑफर, अलीने मिर्झापूरसाठी दिला होता नकार ) तिच्यावर अश्लील व्हिडीओ शूट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आता नेटिझन्स पूनम पांडेला पाठिंबा देत आहेत. पूनम पांडेच्या व्हायरल झालेल्या फोटोंची तुलना मिलिंद सोमणच्या फोटोशी केली जात आहे. फिल्ममेकर अपूर्व असरानी याने देखील पोस्ट शेअर कर पूनम पांडेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘गोव्यामध्ये नुकतेच पूनमने काहीसे तर आणि मिलिंदने संपूर्ण कपडे उतरवले. अश्लीलतेमुळे पांडे आता कायदेशीर संकटात आहे तर 55व्या वर्षीही असे फिट शरीर असणाऱ्या सोमणचे कौतुक होत आहे. मला असे वाटते की आपण न्यूड स्त्रीपेक्षा पुरुषांशी अधिक चांगले वागतो’
#MilindSoman running on the beach is not soft porn. It is not even porn. It is a man running and enjoying his birthday without trying to titillate anyone. His wife clicked the picture.
— Amar (@amarvanee) November 5, 2020
Can you say the same thing about #PoonamPandey
It's not about feminism but vulgarity. https://t.co/FsnR7unAZq
दरम्यान अपूर्वच्या या पोस्टवर अनेकांनी पूनमला पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी मिलिंद सोमणच्या फोटोमध्ये अश्लीलता नव्हती हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. मिलिंदने बुधवारी त्यांच्या वाढदिवशी हा फोटो शेअर केला होता. त्याची बायको अंकिता हिनेच हा फोटो क्लिक केला होता.