मुंबई, 05 नोव्हेंबर: गेल्या महिनाभरापासून वेब विश्वात ‘मिर्झापूर 2’ (Mirzapur 2) या वेब सीरिजचा बोलबाला आहे. या सीरिजमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या सीझनमध्ये ज्यांनी भूमिका साकारल्या होत्या त्यांच्या पात्रामध्ये दुसऱ्या सीझनमध्ये बरेट ‘ट्वीस्ट अँज टर्न्स’ आले आहेत. प्रत्येक पात्राचा अंदाज बदलला आहे. या सीरीजमधील कालीन भैया, मुन्ना भैया, डिंपी, गोलू, गुड्डू, बिना, शरद शुक्ला, बाबुजी, मकबुल, बाबर या आणि इतरही सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहणाऱ्या आहेत. यामधील ‘गुड्डू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिनय करणारा अली फझल (Ali Fazal) ही भूमिका देखील तितक्याच ताकदीने साकारत आहे. मात्र तुम्हाला हे माहित आहे की ‘गुड्डू भैया’ अर्थात अली फझलला या सीरिजमध्ये याआधी दुसरी भूमिका ऑफर करण्यात आली होती. अलीला ती भूमिका फारशी न आवडल्याने वेबसीरिज करण्यास नकार दिला होता.
अली फझलने नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. त्याने असे म्हटले होते की, ‘मिर्झापूरमध्ये मला गुड्डूचं पात्र आवडलं होतं, पण मला याआधी दुसरं पात्र देण्यात आलं होतं. मला वाटतं कदाचित तो मुन्नाचा रोल होता, जो आता दिव्येंदूने केला आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला गुड्डूचं पात्र फार आवडलं होतं कारण मला असं वाटलं होतं की मी यामध्ये खूप काही करू शकतो’. (हे वाचा- ‘एक शेरनी और एक भेडियों का झुंड’, संजय राऊत यांच्या ट्वीटवर कंगनाची प्रतिक्रिया) अलीने असे म्हटले की, ‘मला त्या भूमिका करायला आवडतात ज्या माझ्यासाठी अनप्रेडिक्टेबल असतात. जर सीरिजमध्ये काय होईल याचा मी आधीच माझ्या डोक्यात शोध घेतला तर त्यात काहीच मजा येणार नाही. मग मी कारणं दिली. मी असं सांगितलं की माझ्याकडे डेट्स नाही आहेत. काहीतरी काम आलं आहे आणि मी निघालो. त्यानंतर मला पुन्हा कॉल आला आणि त्यांनी म्हटले की आम्हला बघायचे आहे, एकदा प्रयत्न करू.’ (हे वाचा- किंग खानसाठी महानायकाशी भिडली रेखा; KBC च्या सेटवरच BIG B यांनी मागितली माफी ) पहिल्या सीझनंतर आता दुसऱ्या सीझनमध्ये देखील ‘गुड्डू’च्या भूमिकेची प्रशंसा होत आहे. सीझनचा शेवट गुड्डूच्या धमाकेदार स्टाइलमध्ये झाला आहे. पुढच्या सीझनमध्ये ‘गुड्डू भैया’ आणि ‘गोलू’ मिळून काय भौकाल करणार याची प्रतीक्षा ‘मिर्झापूर’च्या लाखो चाहत्यांना आहे.