अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, पायल घोषचा लैंगिक छळाचा आरोप

अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, पायल घोषचा लैंगिक छळाचा आरोप

अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनुराग कश्यपला बुधवारी मुंबई पोलिसांनी समन जारी केले होते. गुरुवारी 11 वाजता अनुरागला चौकशीकरता बोलावण्यात आले होते. अनुराग कश्यप वेळेच्य आधीच वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

  • Share this:

मुंबई, 01 ऑक्टोबर : फिल्ममेकर अनुराग कश्यप (Anurag Kashyap)  विरोधात अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिने यासंदर्भात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनुराग कश्यपला बुधवारी मुंबई पोलिसांनी समन जारी केले होते. याप्रकरणी अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पायल घोषने अनुराग कश्यपच्या अटकेची मागणी केली आहे, तर दुसरीकडे अनुराग कश्यपच्या वकिलांनी त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

गुरुवारी 11 वाजता अनुरागला चौकशीकरता बोलावण्यात आले होते. अनुराग कश्यप वेळेच्य आधीच वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता. वर्सोवा पोलीस ठाण्यात अनुराग कश्यपचा जबाब नोंदवला जाईल. अनुरागचे वकील देखील यावेळी उपस्थित आहेत.

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक छळाचा खळबळजनक आरोप केला. नशेत अनुरागने आपल्यासह जबरदस्ती केल्याचं ट्वीट तिने केलं. वर्सोवा पोलीस ठाण्यात पायलने अनुराग कश्यपविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर अनुरागविरोधात कारवाई केली नाही तर उपोषण करेन, असा इशाराही पायल घोषने दिला होता. 19 सप्टेंबरला पायलने ट्वीट करून अनुरागवर आरोप केले होते. 22 सप्टेंबरला तिनं वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. तिने गंभीर आरोप करत अनुरागविरोधात भादवी कलम 376, 354, 341, 342 अंतर्गत तक्रार दाखल केली होती.

(हे वाचा-अमिताभ बच्चन यांची मोठी घोषणा! महानायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ)

दरम्यान या सर्व प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अभिनेत्री कंगना रणौत पायल घोषच्या पाठिशी उभी राहिली. तर अनुरागला अनेक अभिनेत्रींनी पाठिंबा दिला होता. पायल घोषला काहींनी समर्थन केले तर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अनुरागच्या बाजुने त्यांची मत सोशल मीडियावर व्यक्त केली. अगदी अनुरागच्या पूर्वपत्नींनी देखील त्याला पाठिंबा दिला.

(हे वाचा-Taarak Mehta Ka Ooltah Chashma मधील प्रसिद्ध अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह)

पायलने सोशल मीडियावर यानंतर अनेक पोस्ट केल्या आहेत. ती असुरक्षित असल्याचंही तिने म्हटलं होते. 'इंडिया, मी जर छताला लटकलेली सापडले तर लक्षात ठेवा. मी आत्महत्या केली नसेन. त्यांच्याकडे नैराश्य आणि मेडिकेशनची कहाणी तयार आहे', अशी पोस्ट करत तिने तिच्या हत्येबाबत भीती व्यक्त केली होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 1, 2020, 2:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading