मुंबई, 6 ऑगस्ट- बॉलिवूडचा(Bollywood) दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूशी सबंधित असलेल्या ड्रग्स प्रकरणामध्ये (Drugs Case) अभिनेत्री दीपिका पादुकोणची (Deepika Padukone) जुनी मॅनेजर (Ex Manager) करिश्मा प्रकाशच्या (Karishma Prakash) अडचणीत वाढ झाली आहे. स्पेशल NDPS मुंबई कोर्टाने करिश्माचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाशी संबंधित असणाऱ्या ड्रग्स प्रकरणामध्ये अटक होण्याच्या भीतीने करिश्माने अटकपूर्ण जामीनाचा अर्ज केला होता.
दीपिका पादुकोणची जुनी मॅनेजर असणाऱ्या करिश्मा प्रकाशने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये नारकोटिक ड्रग्स एंड साइकोट्रोपिक सबस्टेंस एक्ट कोर्टात आपली अटकपूर्व जामीन दाखल केली होती. मात्र डिफेन्सची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश डब्ल्यू. विध्वंस यांनी ही याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने करिश्माला बॉम्बे हायकोर्टात जाण्याच्या परवानगीवर 25 ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे.
(हे वाचा:राज कुंद्राप्रकरणी खरं बोलल्याची मिळतेय शिक्षा'; गहना वशिष्ठचा पुन्हा पोलिसांवर )
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो ड्रग्स तस्कर आणि बॉलिवूड कलाकारांच्यामध्ये असणाऱ्या कनेक्शनची तपासणी करत आहे. ड्रग्सचं हे पूर्ण प्रकरण गेल्यावर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलं होतं. सीबीआय वेगवगेळ्या बाजूने सुशांतच्या निधनाची चौकशी करत आहे. या प्रकरणामध्ये अटक झालेल्या ड्रग्स तस्करांच्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणची जुनी मॅनेजर करिश्मा प्रकाशचं नाव समोर आलं होतं.
(हे वाचा: Raj Kundra Case:शर्लिनची आज होणार चौकशी; मुंबई क्राईम ब्रँचने पाठवला समन्स)
यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मोठ मोठ्या बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली होती. सेन्ट्रल एजेन्सीने आत्ता पर्यंत ड्रग्स प्रकरणामध्ये तब्बल 20 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. तसेच अभिनेता सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि अनेक आरोपी सध्या जामीनावर बाहेर आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.