मुंबई, 6 ऑगस्ट- शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) 19 जुलैपासून पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये जेलमध्ये आहे. सध्या तो न्यायालयिन कोठडीमध्ये आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सबळ पुरावे सापडल्याचं म्हटलं आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये (Pornography Case) अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राचंसुद्धा(Sherlyn Chopra) नाव आहे. शर्लिनने राज कुंद्रावर अनेक गंभीर आरोपसुद्धा केले आहेत. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रँच पुन्हा एकदा अभिनेत्री शर्लिन चोप्राची चौकशी करणार आहेत. त्यासाठी मुंबई पोलिसांनी शर्लिनला समन्ससुद्धा पाठवला आहे.
Property Cell of Mumbai Police Crime Branch has summoned actress Sherlyn Chopra asking her to appear before it for questioning today in connection with the porn film production case in which businessman Raj Kundra was arrested: Mumbai Police pic.twitter.com/6J5PjhzrW8
— ANI (@ANI) August 6, 2021
पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्राची याआधीही चौकशी करण्यात आली आहे. अभिनेत्रीचं म्हणणं आहे, की या प्रकरणात पोलिसांकडे जबाब नोंदवणारी ती आहे. आत्ता राज कुंद्राच्या अटकेनंतर शर्लिन चोप्राची पुन्हा एकदा चौकशी होणार असल्याचं समोर आलं आहे.
(हे वाचा:धक्कादायक! निर्माता विभू अग्रवालला लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक)
वृत्तसंस्था ANI च्या ट्वीटनुसार, मुंबई पोलीस क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेल डिपार्टमेंटने अभिनेत्री-मॉडेल शर्लिन चोप्राला समन्स पाठवला आहे. त्यामुळे तिला चौकशीसाठी पोलिसांसमोर उपस्थित राहावं लागणार आहे. म्हणजे शर्लिनला आजचं पोलिसांजवळ उपस्थित राहावं लागणार आहे.
(हे वाचा:आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी धर्मेंद्र यांच्या घरासमोर उभी केली गाडी )
शर्लिन चोप्राला सुरुवातीपासूनचं माहिती होतं की या प्रकरणामध्ये तिचीसुद्धा चौकशी होणार, आणि म्हणूनचं तिने कोर्टात आधीचं जामीन याचिका केली होती. मात्र कोर्टाने ती फेटाळून लावली आहे. तसेच अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने राज चोप्रावर फसवणुकीचा आरोप केला होता. त्यांनतर शर्लिन चोप्राने आरोप केला होता की, तिला पोर्न इंडस्ट्रीमध्ये आणणारा राज कुंद्राचं होता. महाराष्ट्रा सायबर सेलला दिलेल्या जबाबामध्ये शर्लिन चोप्राने म्हटलं होतं, की तिला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये मिळत होते. अशाप्रकारचे तिने 15 ते 20 प्रोजेक्ट केले आहेत. मात्र तिला ठरावानुसार आपलं मानधन मिळत नव्हत. त्यामुळे तिने एका वर्षातचं आपला करार समाप्त केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Raj kundra