Home /News /entertainment /

BREAKING :अर्जुन रामपालच्या घरावर NCB चा छापा, ड्रायव्हरला घेतले ताब्यात

BREAKING :अर्जुन रामपालच्या घरावर NCB चा छापा, ड्रायव्हरला घेतले ताब्यात

अंमली विरोधी पथकाने आज सकाळी अर्जुन रामपाल यांच्या अंधेरी आणि वांद्रे येथील घरावर कारवाई केली आहे.

मुंबई, 09 नोव्हेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या ( Sushant Singh Rajput Case Drugs Connection) तपासातून बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर आले आहे. अंमली विरोधी पथक ( Narcotics Control Bureau) ने आता बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) याच्याघरी छापा टाकला आहे. NCB च्या टीमने याआधी अर्जुनच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. अंमली विरोधी पथकाने आज सकाळी अर्जुन रामपाल यांच्या अंधेरी आणि वांद्रे येथील घरावर कारवाई केली आहे. अर्जुनच्या घराची झाडाझडती सुरू आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावं जाहीर याआधी एनसीबीने ड्रग्स बाळगणे आणि खरेदी करण्याप्रकरणी अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड ग्रॅब्रिएला डिमेट्रिएड्सचा भाऊ अगिसियालोस याला ताब्यात घेतले होते. त्याला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला होता. पण पुन्हा एकदा एनसीबीने अगिसियालोसला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रविवारीच  ड्रग कनेक्शनमध्ये निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या पत्नीलाही एनसीबीने अटक केली.  मुंबईतील लोखंडवाला, मालाड, अंधेरी आणि नवी मुंबई परिसरातही रविवारी छापेमारी करण्यात आली होती. VIDEO : सराफाची नजर चुकवून महिलेनं लंपास केली चेन, चोरीचा थरार CCTVमध्ये कैद एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले. शनिवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईमध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरातून ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला होता. कारवाईमध्ये 10 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. नाडियाडवाला यांचा फोनही एनसीबीने जप्त केला आहे. एनसीबीने छापा मारला तेव्हा नाडियाडवाला घरात नव्हते. याआधी ड्रग्स प्रकरणी  अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), रकुल प्रीत सिंग(Rakul Preet Singh), सारा अली खान (Sara Ali Khan) यांची नावं ड्रग केसमध्ये समोर आल्यानंतर आता निर्माते फिरोज नाडियाडवाला आणि त्यांची पत्नी एनसीबीच्या रडारवर आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या