Home /News /viral /

VIDEO : सराफाची नजर चुकवून महिलेनं लंपास केली चेन, चोरीचा थरार CCTVमध्ये कैद

VIDEO : सराफाची नजर चुकवून महिलेनं लंपास केली चेन, चोरीचा थरार CCTVमध्ये कैद

राजस्थानमधील रामपुरा परिसरात घडली आहे. पीडित सराफाने कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    कोटा, 09 नोव्हेंबर : दिवाळसणाआधी महिलांची सोनं खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. अशावेळी बऱ्याचदा संधीचा फायदा घेऊन चोरी करण्याचे प्रकार देखील वाढताना दिसत आहे. असाच एक चोरीचा थरारक प्रकार सराफ दुकानात घडला. सोनं महाग झाल्यानं एक महिलेनं चक्क सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्यानं चेनवर डल्ला मारला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहून शकता महिलेनं दागिने बघण्याच्या बहाण्यानं गप्पा मारल्या आणि दागिने बघताना हळूच चेन उचलून दुसऱ्या महिलेच्या हातात गुपचूप दिली. मात्र हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बोलण्याच्या नादात या सराफाला गुंग ठेवतात आणि 20 ग्रॅम सोन्याची चेन लंपास करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे वाचा-भयंकर! एकामागोमाग एक 8 गाड्यांची टक्कर, दोघांचा मृत्यू; भीषणता दाखवणारे PHOTO ही धक्कादायक घटना राजस्थानमधील रामपुरा परिसरात घडली आहे. पीडित सराफाने कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या आधारे दोन महिलांचा तपास सुरू आहे. दिवाळीच्या तोंडावर अशा प्रकारच्या घटना घडत असल्यानं चिंता व्यक्त केला जात आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या