Home /News /entertainment /

ड्रग्ज प्रकरणात शाहरुख, रणबीर आणि अर्जुनही अडकणार? NCB च्या रडारवर बॉलिवूड

ड्रग्ज प्रकरणात शाहरुख, रणबीर आणि अर्जुनही अडकणार? NCB च्या रडारवर बॉलिवूड

बॉलिवूडमधील ड्रग प्रकरणात अभिनेत्रींनंतर आता काही बडे अभिनेते देखील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहेत.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) मध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात दीपिका पादूकोण (Deepika Padukone), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), सारा अली खान (Sara Ali Khan), रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) या बड्या अभिनेत्रींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून चौकशी देखील करण्यात आली. दरम्यान यामध्ये आता काही सुपरस्टार अभिनेत्यांची चौकशी होईल अशी शक्यता देखील मीडिया अहवालातून व्यक्त केली जात आहे. बॉलिवूडमधील 3 मोठे पुरुष स्टार्स एनसीबीच्या रडारवर आहेत, असे यामध्ये बोलले जात आहे. S, D, A अशी अद्याक्षरं या चौकशीदरम्यान समोर आली आहेत. ही तिनही नावं बॉलिवूडमधील मोठी नावं आहेत. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. या मीडिया अहवालानुसार एनसीबीच्या तपासात समोर आलेली A, D, S ही अद्याक्षरं म्हणजे शाहरुख खान (Shahrukh Khan), डिनो मोरिया (Dino Morea) आणि अर्जुन रामपाल (Arjun Rampal) यांची नावं आहेत. दरम्यान केवळ अद्याक्षरं समोर आल्याने पुराव्याशिवाय कोणताही दावा करता येणार नाही अशी माहिती एनसीबीकडून मिळते आहे. या मीडिया अहवालाने असा दावा केला आहे की, एनसीबीच्या दिल्ली बेस्ड एका अधिकाऱ्याने याबाबत नाव समोर न येऊ देण्याच्या नावावर या बड्या अभिनेत्यांच्या नावाबाबत सांगितले आहे. या अहवालानुसार अर्जुन रामपाल शाहरुखला ड्रग पुरवत असे. तर डिनो मोरिया कुणाला ड्रग सप्लाय करायचा याबाबत माहिती समोर येणे बाकी असल्याचे या अधिकाऱ्याकडून समजले आहे. (हे वाचा-अनुराग कश्यपची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू, पायल घोषचा लैंगिक छळाचा आरोप) त्याचप्रमाणे या अहवालानुसार R हे अद्याक्षर देखील समोर आले आहे. दरम्यान R म्हणजे रणबीर कपूर (Ranbir Kapoor)चे नाव असावे असा अंदाज एनसीबीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे. मात्र त्याबाबत ठोस अशी प्रतिक्रिया मिळालेली नाही आहे. करण जोहरच्या घरामध्ये गेल्यावर्षी झालेल्या त्या वादग्रस्त पार्टीमध्ये देखील रणबीर उपस्थित होता. दरम्यान करण जोहर, विकी कौशल यांनी त्या पार्टीत कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज घेतले गेले नाही असे सांगितले आहे. (हे वाचा-'काळी' म्हणून ट्रोल करणाऱ्यांचे स्क्रीनशॉट शेअर करत सुहाना खानने दिलं चोख उत्तर) किंग खान शाहरुख सध्या दुबईमध्ये आयपीएल एन्जॉय करत आहे, तर अर्जुन एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. डिनो मोरिया देखील सध्या मुंबईतच आहे. अशावेळी त्यांचे नाव ड्रग केसमध्ये (Drug Case) समोर येणं बॉलिवूडसाठी धक्कादायक आहे. तर काही दिवसांपूर्वी रणबीर देखील कुटुंबाबरोबर त्याचा वाढदिवस साजरा करताना पाहायला मिळाला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bollywood, Ranbir kapoor, Shahrukh khan

    पुढील बातम्या