भन्साळी निर्मिती संस्थेनं स्वतः एक अहवाल सादर करत म्हटलं आहे. की आम्ही म्हणजेच भन्साळी निर्मिती संस्थेनं ‘गोलीयों की रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’च्या संबंधात इरॉस नाउसोबत असलेला आमचा करार आत्ता रद्द केला आहे. त्याचबरोबर भन्साळी निर्मिती संस्थेनं चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी, प्रस्तुती वेळी किंवा या चित्रपटांच्या अन्य बाबतीत भूतकाळात इरॉससोबत करार केलेल्या लोकांनासुद्धा याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच भविष्यकाळात यासंबंधी कोणताही करार न करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी इरॉस नाउने संस्थेचं नाव बदलून ‘इरॉस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशन’ असं ठेवलं आहे. त्यांनतरचं भन्साळी आणि इरॉजमध्ये खरा वाद सुरु झाला आहे आणि हा वाद आता इतका वाढला आहे कि संजय लीला भन्साळीनं इरॉससोबत आपले सर्व संबंध संपवले आहेत. इतकचं नव्हे तर काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळीनं इरॉसच्या संस्थेविरुद्ध न्यायालयात तक्रार सुद्धा दाखल केली होती आणि त्यानुसार न्यायाधीशांनी इरॉस नाउच्या संस्थेला भन्साळी निर्मिती संस्थेला तब्बल 19.39 लाख रुपये इतकी रक्कम देण्याचा आदेश दिला होता. तसेच याविरुद्ध बोलत इरॉस यांनी स्वतः आपण भन्साळी संस्थेविरुद्ध कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं होतं. संजय लीला भन्साळी आणि इरॉस नाउ यांची निर्मिती असलेले हे दोन चित्रपट प्रचंड गाजले होते. मात्र या दोघांमध्ये नंतर कॉपीराईट संदर्भात वितुष्ट निर्माण झालं होतं आणि हा वाद इतका वाढला कि त्यांना शेवटी कायद्याचा आधार घ्यावा लागला. (हे वाचा:कामासाठी स्टुडिओसमोर तासंतास बसायचा; आमिरमुळं बदललं अमित त्रिवेदीचं आयुष्य) 2015 मध्ये बाजीराव मस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये दीपिका पदुकोन, रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट चाहत्यांकडून खूपच पसंत गेला होता. तसेच ‘गोलीयों की रासलीला रामलीला’ हा चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये सुद्धा दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांची केमिस्ट्री लोकांना खुपचं पसंत पडली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Deepika padukone, Eros now, Friendship, Ranvir singh