Home /News /entertainment /

बिग बींनी शेअर करुन लगेचच डिलीट केला Dhaakad चा ट्रेलर, कंगना म्हणते- कुणाचा दबाव असेल?

बिग बींनी शेअर करुन लगेचच डिलीट केला Dhaakad चा ट्रेलर, कंगना म्हणते- कुणाचा दबाव असेल?

बिग बी यांनी हा ट्रेलर चुकून पोस्ट केला होता की त्यांनी चुकून ही पोस्ट डिलीट केली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या घटनेवर आता कंगना रणौतने (Kangana Ranaut Reaction on Amitabh Bachchan) देखील प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 12 मे: कंगना रणौत (Kangana Ranaut Dhaakad) तिचा आगामी चित्रपट 'धाकड'च्या प्रदर्शनामध्ये सध्या व्यग्र आहे. कंगनाच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर (Kangana Ranaut Dhaakad Trailer) ट्वीट केला होता पण काहीत मिनिटांत त्यांनी तो हटवला (Amitabh Bachchan Deleted Dhaakad Trailer Tweet). या घटनेनंतर नेटिझन्स काहीसे गोंधळात पडले असून, बिग बी यांनी हा ट्रेलर चुकून पोस्ट केला होता की त्यांनी चुकून ही पोस्ट डिलीट केली असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या घटनेवर आता कंगना रणौतने (Kangana Ranaut Reaction on Amitabh Bachchan) देखील प्रतिक्रिया दिली आहे. नुकतेच कंगना रणौतने यूट्युब चॅनेल ट्राईड अँड रिफ्युस्ड प्रोडक्शनला दिलेल्या मुलाखतीत या घटनेबद्दल सांगितले. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोठ्या स्तरावरील व्यक्तिमत्वावर कोणाचा दबाव असेल असे मला वाटते, असं ती म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ट्वीट केल्यानंतर बिग बींनी 'धाकड'चा ट्रेलर का डिलीट केला याचे कारण ती कधीच सांगू शकत नाही. हे वाचा-सलमान खानच्या या अभिनेत्रीचं वजन एकेकाळी होतं 113 किलो, झरीन खानची Fat to Fit जर्नी आहे Motivating कंगना रणौतने ही परिस्थिती कॉम्प्लेक्स असल्याचे म्हणत अशी प्रतिक्रिया दिली की, 'पसंती आणि नापसंती असते, पण हे इतके हिट होणारे आहे की मिस्टर बच्चन यांनी ट्रेलर ट्वीट केला आणि नंतर त्यांनी अगजी पाच-दहा मिनिटांत तो हटवला. त्यांच्यासारख्या स्टेटसच्या व्यक्तीवर कोण दबाव आणणार? मला माहित नाही, मला ही परिस्थिती थोडी क्लिष्ट वाटते.' हे वाचा-Johnny Depp करतोय आपल्याच वकिलीणबाईंना डेट? Ex-पत्नीविरोधात कोर्टात सुरू आहे खटला कंगना रणौतने याबाबतही भाष्य केले की, तिच्या कामाचे इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींनी कौतुक कसे करत नाहीत. वैयक्तिक असुरक्षिततेमुळे हे घडत असावे, असा आरोप तिने केला आहे. ती असं म्हणते की, 'मला वाटते की कुठेतरी खूप वैयक्तिक असुरक्षितता अजूनही लोकांमध्येही आहे. हे कलाकार मला आणि माझ्या कामाला आणि विशेषत: महिलांसाठी प्रोत्साहन देण्यात का अपयशी ठरत आहेत?' कंगना पुढे असं म्हणाली की, बॉलिवूडमधील चांगले काम आणि चित्रपटांसाठी त्या लोकांनी केलेल्या कामाचे कौतुक करण्यात ती कधीही कमी पडत नाही. करण जोहरचा 'शेरशाह' असो, विवेक अग्निहोत्रींचा 'द कश्मीर फाइल्स' असो किंवा एसएस राजामौलींचा 'आरआरआर' असो, तिने नेहमीच चांगल्या चित्रपटांचे कौतुक केले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amitabh Bachchan, Kangana ranaut

    पुढील बातम्या