Home /News /entertainment /

Johnny Depp करतोय आपल्याच वकिलीणबाईंना डेट? Ex-पत्नीविरोधात कोर्टात सुरू आहे खटला

Johnny Depp करतोय आपल्याच वकिलीणबाईंना डेट? Ex-पत्नीविरोधात कोर्टात सुरू आहे खटला

जॉनी डेपच्या वतीनं वकील कॅमिल वास्क्वेझ (Camille Vasquez) ही या प्रकरणातील कायदेशीर बाबी बघत आहे. या दरम्यान, इंटरनेटवर कॅमिल आणि जॉनीच्या रिलेशनशीपच्या (Johnny Depp and Camille Vasquez Relationship) चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबई, 12 मे: पायरेट्स ऑफ द कॅरेबियन (Pirates of the Caribbean) या फिल्म सीरिजमुळे प्रसिद्ध झालेला अमेरिकन अ‍ॅक्टर जॉनी डेप (Johnny Depp) गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. जॉनीनं त्याची एक्स वाईफ आणि अ‍ॅक्ट्रेस अँबर हर्ड (Amber Heard) विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. व्हर्जिनियातील फेअरफॅक्स कोर्टात (Fairfax Court) या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. जॉनी डेपच्या वतीनं वकील कॅमिल वास्क्वेझ (Camille Vasquez) ही या प्रकरणातील कायदेशीर बाबी बघत आहे. या दरम्यान, इंटरनेटवर कॅमिल आणि जॉनीच्या रिलेशनशीपच्या (Johnny Depp and Camille Vasquez Relationship) चर्चांना उधाण आलं आहे. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा इंटरनेटवर सुरू आहे. एका युजरनं ट्वीट केलं आहे, 'मैत्री असो किंवा आणखी काही, मला जॉनी डेप आणि कॅमिल वास्क्वेझची केमेस्ट्री दिसत आहे.' आणखी एका युजरनं लिहिलं की, 'जर जॉनी डेप कॅमिल वास्क्वेझला डेट करत असेल तर वकिलाला डेट करणं हे फारच रोमांचकारी ठरेल. माझ्या मते ती सिंगल आहे कारण फ्लर्टिंग दिसत आहे. ते कायम आनंदी राहोत.' या सारखी अनेक ट्वीट्स दिवसेंदिवस केली जात आहेत. तसंच इतर सोशल मीडिया साईट्सवर या दोघांच्या डेटिंगची चर्चा सुरू आहे. मात्र, कॅमिल वास्क्वेझच्या जवळच्या सूत्रांनी टीएमझेडशी बोलताना डेटिंगच्या बातम्या नाकारल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनी आणि कॅमिलच्या डेटिंगच्या बातम्या या सोशल मीडियावरील फॅन फिक्शन (Fan Fiction) आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अँबरच्या आर्टिकलमुळे जॉनीचं करिअर संकटात अँबर हर्डनं 2018 मध्ये वॉशिंग्टन पोस्टसाठी (The Washington Post) एक आर्टिकल लिहिलं होतं. त्यामुळे आपलं करिअर उद्ध्वस्त (Career Ruined) झालं, असा दावा करत जॉनी डेपनं एंबर हर्डवर मानहानीचा खटला (Defamation Suit) दाखल केला आहे. या आर्टिकलमध्ये अँबरनं कौंटुबिक हिंसाचाराबद्दल (Domestic Violence) लिहिलं होतं. पण, तिनं कुठेही थेट जॉनीचा उल्लेख केलेला नव्हता. तरीदेखील या आर्टिकलचा आपल्या करिअरवर परिणाम झाल्याची जॉनीला खात्री आहे.
View this post on Instagram

A post shared by @johnnyandcamille

2015 मध्ये झालं होतं जॉनी आणि अँबरचं लग्न जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांनी 2015 मध्ये लग्न केलं होतं. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. मे 2016 मध्ये ते एकमेकांपासून वेगळे राहू लागले. अँबरनं जॉनीवर लैंगिक शोषणाचे (Sexual Assault) आरोप केले होते. जॉनीने हे सर्व आरोप नाकारले होते. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट (Johnny Depp Amber Heard Divorce) झाला होता. हे वाचा- जॉनीनं अँबरविरोधात मानहानीचा दावा ठोकल्यानं दोघांच्या नात्यातील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या दरम्यानच जॉनी आणि त्याची वकील कॅमिलच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आल्यानं, हे प्रकरण आणखी रंजक झालं आहे.
First published:

पुढील बातम्या