बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान (Zareen Khan) हिला सलमान खानने बॉलिवूडमध्ये आणलं असं म्हटलं जातं. 14 मे रोजी ही अभिनेत्री तिचा वाढदिवस साजरा करते, आज झरीन फिट अभिनेत्रींपैकी एक असली तरी एकेकाळी तिला बॉडी शेमिंग देखील सहन करावे लागले आहे. तिने मेहनत आणि जिद्दीने लोकांना सडेतोड उत्तर दिले आहे. (फोटौ सौजन्य- zareenkhan/Instagram)
झरीन खान तिच्या सिनेमांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. अनेकदा तिला तिच्या शरीरयष्टीवरुन टोमणे ऐकावे लागले आहेत. (फोटो सौजन्य-zareenkhan/Instagram)
मीडिया रिपोर्टनुसार झरीन खानचे वजन एकेकाळी 113 किलो देखील होते. लोकं तिला 'मोटी' म्हणत असत पण त्यावरुन तिच्यावर काही परिणाम होत नसे. तिच्या आयुष्याने वेगळं वळण तेव्हा घेतलं जेव्हा तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram)
रिपोर्ट्सनुसार झरीन जेव्हा 12 वी च्या वर्गात होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यामुळे कमी वयात तिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली होती. त्यावेळी तिने एअर हॉस्टेस बनण्याचा निर्णय घेतला होता. (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram)
झरीनने एका मुलाखतीत म्हटले होते की पण अशा धडधाकट मुलीला कोण एअर हॉस्टेस का बनवेल. त्यामुळे तिने वेट लॉस जर्नी सुरू केली. (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram)
झरीन खानने अशी माहिती दिली की तिच्याकडे त्यावेळी एवढे पैसे नव्हते की डायटिशयनकडून सल्ला घेऊ शकली असती. त्यामुळे तिने गुगलचा सहारा घेतला. तिने इंटरनेटवर देण्यात आलेलं वेगवेगळं डाएट फॉलो केलं. तिची ही मेहनत कामी आली आणि तिचे वजन कमी झाले (फोट सौजन्य- zareenkhan/Instagram)
झरीन खानने डाएटसह एक्सरसाइज देखील सुरू केली. हळू-हळू परिणाम जाणवू लागला आणि अभिनेत्रीला स्वत:च एनर्जेटिक वाटू लागलं. अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार ती 'कीटो डाएट' फॉलो करत होती. अनेकदा तिने इंटरमिटेंट फास्टिंग देखील केले आहे (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram)
तिने अशी टीपही दिली आहे की वजन कमी करायचं असेल तर वर्कआउटसह खूप पाणी देखील प्या. तहान जरी नाही लागली असेल तरी पाणी पिणं आवश्यक आहे. (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram)
अलीकडेच झरीन खान हिचं ‘ईद हो जाएगी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यामध्ये तिच्यासह 'बिग बॉस' फेम उमर रियाझ देखील पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य- zareenkhan/Instagram )