मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

दीपिका पदुकोण आणि रणवीरचा हटके डान्स; VIDEO प्रचंड व्हायरल

दीपिका पदुकोण आणि रणवीरचा हटके डान्स; VIDEO प्रचंड व्हायरल

deepika

deepika

दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवरून (Instagram) तिचा आणि रणवीरचा एक नवीन डान्स व्हिडीओ (Deepika Padukone dance) शेअर केला आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज अतिशय आवडला असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

  • Published by:  news18 desk

मुंबई, 11 मार्च: दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer singh) बॉलीवूड (Bollywood) मधलं एक पॉप्युलर कपल म्हणून पाहिलं जात. हे दोघेही सोशल मीडियावर सतत सक्रीय असतात आणि नेहमीच आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतात. आता दीपिका पदुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊटवरून (Instagram) तिचा आणि रणवीरचा एक नवीन डान्स व्हिडीओ (Deepika Padukone dance) शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डान्ससोबतच हे कपल धमाल-मस्ती करताना सुद्धा दिसून येत आहे. चाहत्यांना त्यांचा हा अंदाज अतिशय आवडला असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

बुसिट चॅलेंज या हॅशटॅगखाली दीपिकाने हा व्हिडीओ तयार केला आहे. तिने त्याला ‘वर्क इट बेबी.’ असं कॅप्शन दिल असून त्यामध्ये रणवीर सिंगला देखील टॅग केलं आहे. हा व्हिडीओ केवळ एका तासामध्येच 4 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत, यावरूनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो. चाहत्यांसह इतर बॉलिवूड सेलिब्रिटीही या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.

   अमिताभ बच्चन जगात भारी; पटकावला सिनेसृष्टीतील सर्वात मोठा FIAF पुरस्कार

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बॉलीवूडमधल्या हिट कपल पैकी एक मानले जातात. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. रणवीर सिंगच्या आगामी ‘83’ चित्रपटात दोघेही पुन्हा एकत्र दिसणार आहे. ‘83’ ची कहाणी ही 1983 च्या भारतीय क्रिकेट टीमच्या ऐतिहासिक विश्वकप विजयावर आधारित आहे, ज्यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याआधी दीपिका ‘छपाक’ (chapaak) चित्रपटात दिसली होती. सध्या शाहरुख खान सोबत ती ‘पठान’च्या (Pathan)  शुटींगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच दीपिकाकडे अजूनही काही मोठे चित्रपट आहेत.

First published:

Tags: Bollywood, Deepika padukone, Ranveer sigh, Social media viral, Top trending, Viral video.