मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

अमिताभ बच्चन जगात भारी; पटकावला सिनेसृष्टीतील सर्वात मोठा FIAF पुरस्कार

अमिताभ बच्चन जगात भारी; पटकावला सिनेसृष्टीतील सर्वात मोठा FIAF पुरस्कार

अमिताभ यांच्या कौशल्याचं कौतुक आता 'इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स' (International Federation of Film Archives) करणार आहे. बिग बींना FIAFद्वारे सन्मानित केलं जाणार आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 11 मार्च: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कौशल्याचं कौतुक आता 'इंटरनेशनल फेडरेशन ऑफ फिल्म आर्काइव्स' (International Federation of Film Archives) करणार आहे. बिग बींना FIAFद्वारे सन्मानित केलं जाणार आहे. FIAF हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार पटकावणारे ते भारतातील पहिले अभिनेता ठरले आहेत. हॉलिवूड दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सेस आणि क्रिस्टोफर नोलन (Martin Scorsese and Christopher Nolan) येत्या 19 मार्चला हा पुरस्कार त्यांना प्रदान करणार आहेत.

FIAF पुरस्काराचा यंदाचा २०वा वार्षिक समारोह आहे. FIAFचे अध्यक्ष फेडरिक मेरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ते वेगळ्याच पद्धतीने हा पुरस्कार सोहळा साजरा करणार आहेत. यंदा या सोहळ्यामध्ये वर्षभरात गाजलेल्या शॉर्ट फिल्म आणि कलाकारांच्या मुलाखती देखील दाखवल्या जाणार आहेत. दरवर्षी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे साजरा केला जातो. मात्र यंदा करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे तो ऑनलाईन पार पाडला जाणार आहे.

अवश्य पाहा - Birthday Special: इंजिनियरिंग करणारी पूनम पांडे का झाली पॉर्नस्टार?

'फिल्म हेरिटेज फाउंडेशननं FIAF पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना नामांकित केलं होतं. सर्वोत्कृष्ट अभिनेता या गटात त्यांच्यासोबतच टॉम हँक्स, ब्रॅडली कूपर, लिओर्नादो डिक्रॅप्रिओ, मॅट डेमन यांसारखे नामांकित कलाकार होते. परंतु यांच्यावर मात करत बिग बींनी FIAF पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. या पुरस्काराठी बिग बींनी सर्व पर्यावेक्षक आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, Marathi entertainment