मुंबई, 02 एप्रिल: सध्या देशामध्ये 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे. भारत सरकारने परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना देखील भारतामध्ये आणून मोलाची कामगिरी बजावली आहे. संपूर्ण देश एक होऊन यावेळी कोरोनाशी लढा देत आहे. क्वारंटाइन राहून कोरोनाचं (Coronavirus) संक्रमण रोखण्याचा प्रयत्न सर्वांकडून करण्यात येत आहे. याप्रसंगात बॉलिवूड (Bollywood) मधील कलाकार देखील मदतीचा हात पुढे करत आहेत. शूटिंग थांबवून, आयसोलेशनमध्ये राहुन प्रत्येकजण सरकारला मदतच करत आहे. मात्र काही कलाकार लॉकडाऊन आहे, परदेशात गेले होते आणि भारताने कोरोनाबाबतीत कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केल्यानंतर ते तिथेच अडकले होते. अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla)च्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार घडला होता. लंडनमध्ये अडकलेली जुही मोठ्या समस्यांचा सामना करत भारतात परतली आहे.
(हे वाचा-राम गोपाल वर्माच्या 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याच्या ट्वीटनंतर युजर्सचा संताप
चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेला हा व्हायरस, संपूर्ण जगात पसरला. इटली, स्पेन या देशांमध्ये तर चीनपेक्षा अधिक बळी गेले आहेत. भारताने वेळीच सावध होत लॉकडाऊनचं पाऊल उचललं खरं, पण यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबर लंडनला गेलेली जुही चावला तिथेच अडकली होती. भारतीय दुतावासाच्या मदतीने ती भारतात परतली आहे.
(हे वाचा-टायगरआधी 'या' अभिनेत्याबरोबर होतं दिशाचं रिलेशनशीप,पुन्हा होत आहेत Photo Viral
20 मार्चला जुही भारतात परतली. मिड डे शी बोलताना तिने घडला वृतांत सांगितला. तिने सांगितलं की, सुट्टीसाठी ती आणि तिचं कुटुंब मार्चच्या पहिल्या आठवड्याच ऑस्ट्रियाला गेले होते. मात्र तिथे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यांनी त्वरीत लंडन गाठलं. लंडनमध्ये जुहीचं फॅमिली होम आहे. मार्चच्या मध्यात लंडनमधीलही परिस्थिती बिघडू लागली. भारतामध्येही कोरोनासंबधित हालचालींना वेग आला होता. भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी आणल्याने तिच्याकडे लंडनमध्ये थांबण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण तिला भारतात परतायचे होते. जुही पुढे म्हणाली की, भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांच्या मदतीने ती भारतात परतली आहे.
(हे वाचा-'...तर अभिनय करायचा विचार केला नसता', अभिनेता सुबोध भावेची प्रतिक्रिया
20 मार्चला जुही तिचा नवरा जय मेहता, मुलगी जान्हवी आणि मुलगा अर्जूनबरोबर भारतमध्ये परतली. तेव्हापासून ती होम क्वारंटाइन आहे. लंडनमधूनच परतलेली कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने चिंतेचं वातावरण आहे. तिच्या आतापर्यंतच्या 5 टेस्टमध्ये कनिका कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona