Home /News /entertainment /

अमृता रावच्या घरी थोड्याच दिवसात येणार 'नवा पाहुणा', पहिल्यांदा शेअर केला Baby Bump चा फोटो

अमृता रावच्या घरी थोड्याच दिवसात येणार 'नवा पाहुणा', पहिल्यांदा शेअर केला Baby Bump चा फोटो

2020 मध्ये बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. आता अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao)हिने देखील आई होणार असल्याचे जाहीर केले आहे.

  मुंबई, 20 ऑक्टोबर :  बॉलिवूडमधील अनेक 2020 या वर्षामध्ये अभिनेत्रींनी त्यांच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याची एंट्री होणार असल्याचे जाहीर केले आहे. अनुष्‍का शर्मा (Anushka Sharma) , करीना कपूर (Kareena kapoor), अनीता हसनंदानी (Anita Hasnandani)यांसारख्या अनेक अभिनेत्रींनी ही Good News दिली आहे. आता अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) हिने देखील आई होणार असल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी अमृताचा एका क्लिनिक बाहेरचा फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती बेपी बंप फ्लाँट करत होती. दरम्यान आता अभिनेत्री स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. अभिनेत्री अमृता राव नऊ महिन्याची प्रेग्नेंट असल्याची माहिती तिने सोशल मीडियावरून दिली आहे. यामध्ये तिने पती आरजे अनमोल (RJ Anmol) बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने असे म्हटले आहे की, 'तुमच्यासाठी हा दहावा महिना असेल पण आमच्यासाठी नववा आहे.' (हे वाचा-संजय दत्तच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बाब आली समोर, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा) तिने या पोस्टमध्ये म्हटल्यानुसार ही बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करताना अमृताला खूप आनंद होत आहे, त्याचबरोबर इतके दिवस ही आनंदाची बातमी शेअर न केल्यामुळे तिने दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. आरजे अनमोल, अमृता आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हा प्रवास खूप रोमांचक होता असल्याचेही तिने म्हटले आहे.
  'मैं हूं ना', 'व‍िवाह' असे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्री अमृता आणि प्रसिद्ध रेडिओ जॉकी अनमोल यांनी 2016 मध्ये लग्न केलं. त्याआधी 7 वर्ष ते रिलेशनशीपमध्ये होते. अमृता आणि अनमोलने सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर लग्न केले. त्यांनी फक्त कुटुंबीयांबरोबर छोटेखानी लग्नसोहळा केला होता. (हे वाचा-नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO) वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2019 मध्ये अमृता राव शेवटचे 'ठाकरे' या सिनेमात दिसली होती. त्यामध्ये तिने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर केली होती. हा सिनेमा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित होता. अमृताने यामध्ये मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress

  पुढील बातम्या