Home /News /entertainment /

संजय दत्तच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बाब आली समोर, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

संजय दत्तच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बाब आली समोर, जवळच्या व्यक्तीने केला खुलासा

अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) 8 ऑगस्ट रोजी श्वसनाच्या त्रासामुळे लीलावती रुग्णालयात भरती केले होते. यानंतर 3 दिवसांनीच 11 ऑगस्टला हे समोर आले होते की, संजय दत्त फुप्फुसांच्या कर्करोगाशी सामना करत आहे.

   मुंबई, 20 ऑक्टोबर : अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) तब्येतीबाबत त्याचे खूप चिंतेत आहे. तर तुमच्या लाडक्या 'मुन्नाभाई'च्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येते आहे. अशी बातमी मिळत आहे लवकरच तो या आजाराला हरवणार आहे. त्याच्या कुटुंबाशी जवळचे नाते असणाऱ्या एका व्यक्तीने असा खुलासा केला आहे की, संजयवर उपचाराचा चांगला परिणाम होत आहे आणि तो रिकव्हर करत आहे. अभिनेता संजय दत्तला (Sanjay Dutt) 8 ऑगस्ट रोजी श्वसनाच्या त्रासामुळे लीलावती रुग्णालयात भरती केले होते. त्यानंतर लीलावतीमध्ये करण्यात आलेल्या काही टेस्टनंतर 3 दिवसांनीच 11 ऑगस्टला हे समोर आले होते की, संजय दत्त फुप्फुसांच्या कर्करोगाशी सामना करत आहे. संजय दत्तच्या (Sanjay Dutt) मित्र परिवारातील एक असणाऱ्या एका व्यक्तीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, संजय दत्तचे आयुष्य 6 महिन्यांचे आहे अशी बातमी पसरली होती पण त्यात काही तथ्य नाही आहे. त्यांनी पीटीआय-भाषाला असे सांंगितले की, संजय उपचारादरम्यान खूप वेगाने रिकव्हर होत आहे आणि त्याच्यावर चांगला परिणाम दिसत आहे. त्यांनी असे म्हटले की, नुकताच तो तपासणीसाठी गेला असता त्याचे रिपोर्ट उत्तम आले आहेत. देवाची कृपा आणि सर्वांच्या प्रार्थनांसह त्याच्यावर उपचारांचा चांगला परिणाम होत आहे. (हे वाचा-नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO) संजय दत्तवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी तो त्याचे कुटुंबीय आणि मुलांना भेटण्यासाठी दुबईमध्ये गेला होता. ज्याठिकाणी जवळपास 10 दिवस त्याने वेळ घालवला होता. गेल्या महिन्यातच तो मुंबईत परतला आहे.
  काही दिवसांपूर्वी संजय दत्तने एका व्हिडीओमधून त्याच्या आजाराबाबत पहिल्यांदा भाष्य केलं होतं. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकिमने त्याचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये संजय दत्तने अलीमची ओळख सर्वांना करून दिली होती. त्यावेळी त्याने त्याच्या डोक्यावरील एक खूण दाखवली होती आणि कॅन्सरला लवकरच हरवून ठीक होईन असे म्हटले होते. त्याच्या या  व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Sanjay dutt

  पुढील बातम्या