नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO
नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO
सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचं लग्न कधी होणार हा सध्या Showbiz मधील ट्रेंडिंग प्रश्न आहे. नेहाचे रोहनप्रीत (Rohanpreet Singh) बरोबरचे Video आणि फोटोज देखील गेले काही दिवस व्हायरल होत आहेत.
मुंबई, 20 ऑक्टोबर : सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिचं लग्न कधी होणार हा सध्या Showbiz मधील ट्रेंडिंग प्रश्न आहे. नेहाचे रोहनप्रीत (Rohanpreet Singh) बरोबरचे Video आणि फोटोज देखील गेले काही दिवस व्हायरल होत आहेत. 'Nehu Da Vyah' ची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला नेहाचे चाहते ती खरंच लग्न करते आहे की केवळ गाण्याचे प्रमोशन सुरू आहे याबाबत संभ्रमात होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नपत्रिकेचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमधून ही कबुली दिली आहे की ते रिलेशनशीप मध्ये आहेत, पण लग्न करणार ही नाही याचं उत्तर अजून चाहत्यांना मिळणे बाकी आहे.
पुन्हा एकदा नेहा-रोहनप्रीत यांचं लग्न होणार असल्याच्या चर्चा आज होत आहेत. कारण नेहाने एक छोटा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, रोहनने देखील त्याच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये बॅकग्राऊंडला एक रोमँटिक गाणं सुरू आहे तर हे कपल एकमेकांचे हात पकडून बसले आहेत. रोहनने नेहाला जेव्हा त्याच्या कुटुंबियांना भेटवले तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचे नेहाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडीओ नेहाच्या 'रोका'चा असल्याचे म्हणत शेअर केला आहे. Viral Bhayani ने देखील हा व्हिडीओ नेहाच्या रोक्यामधील असल्याचे म्हटले आहे. त्यावर स्वतः नेहाने कमेंट करून म्हटले आहे की, 'Viral हा माझ्या रोक्याचा व्हिडीओ नाही आहे'.
नेहा आणि रोहनप्रीतचे पहिलं एकत्र गाणं असणारा व्हिडीओ उद्या 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'Nehu da Vyah' असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याच्या नावामुळे देखील चाहते संभ्रमात होते. कमेंट सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींना हा प्रमोशन साठी केलेला स्टंट वाटतो आहे, तर काही चाहते नेहाच्या रिलेशनशिप मुळे आनंदात आहेत.
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.