मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC13: महिलांच्या हॅन्डबॅगमध्ये काय असतं?अमिताभ यांच्या प्रश्नावर हेमा मालिनी यांनी दिलं मजेशीर उत्तर

KBC13: महिलांच्या हॅन्डबॅगमध्ये काय असतं?अमिताभ यांच्या प्रश्नावर हेमा मालिनी यांनी दिलं मजेशीर उत्तर

भारतीय सिनेसृष्टीत वेगवेगळे विक्रम केलेला 'शोले' (Sholay) हा सिनेमा रिलीज होऊन अलीकडेच 46 वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने, केबीसीच्या 15 ऑक्टोबरच्या शानदार शुक्रवार एपिसोडमध्ये (Shandaar Shukrawar) शोले सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

 मुंबई,14ऑक्टोबर- 'कौन बनेगा करोडपती'चा 13वा सीझन (KBC - Season 13) सध्या सोनी टीव्हीवर सुरू आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. दर शुक्रवारी या कार्यक्रमाचे विशेष भाग प्रसारित होतात. त्यांना 'शानदार शुक्रवार' असं म्हणतात. या विशेष भागांमध्ये बॉलिवूडचे विविध सेलेब्रिटी सहभागी होत असतात. त्यामुळे तो कार्यक्रम आणखीच रंगतो.

भारतीय सिनेसृष्टीत वेगवेगळे विक्रम केलेला 'शोले' (Sholay) हा सिनेमा रिलीज होऊन अलीकडेच 46 वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने, केबीसीच्या 15 ऑक्टोबरच्या शानदार शुक्रवार एपिसोडमध्ये (Shandaar Shukrawar) शोले सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी (Ramesh Sippy) यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. तसंच, ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनीही (Hema Malini) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्रही व्हिडिओ कॉलद्वारे या शोमध्ये सहभागी होणार असून, अमिताभ बच्चन तर सूत्रसंचालकाच्या रूपात उपस्थित असतीलच. त्या निमित्ताने, केबीसीच्या मंचावर 'शोले'बद्दलच्या आठवणी रंगतील आणि वेगवेगळे किस्से या सिनेमाशी संबंधित सर्व कलाकारांकडून ऐकायला मिळतील. शोले सिनेमाचे काही सुपरहिट सीन्स केबीसीच्या मंचावर रिक्रिएटही केले जाणार आहेत.

(हे वाचा:'फट्टू कोणाला म्हणतात?' KBC 13 मध्ये विचारलेल्या प्रश्नाला दीपिकाने ... )

'मिनी शोले रियुनियन'च्या (Mini Sholay Reunion) या विशेष एपिसोडचे अनेक प्रोमोज आतापर्यंत प्रसारित करण्यात आले आहेत. सोनी टीव्हीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम चॅनेलवरून या विशेष एपिसोडचा आणखी एक मजेदार प्रोमो (Promo) नुकताच शेअर करण्यात आला आहे. त्यावरून तो विशेष एपिसोड किती मजेदार असेल, याचा अंदाज येतो. या प्रोमो व्हिडिओत अमिताभ बच्चन हेमा मालिनी यांना एक प्रश्न विचारतात. त्या प्रश्नाचं त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळेच जण हसतात.अमिताभ बच्चन हेमा मालिनी यांना विचारतात, की बहुतांश महिला घरातून बाहेर पडताना एखादी छोटीशी क्लच बॅग (Clutch Bag) हातात घेऊन बाहेर पडताना दिसतात. ती बॅग तर खूपच छोटी असते; मग त्यात नेमकं काय ठेवलेलं असतं?

(हे वाचा: KBC 13: 'देवाशी कोण बोलतं...' रोहित शर्माला पाहताच फॅन झाला भावुक ...)

हेमा मालिनी आणि तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हा प्रश्न ऐकून हसतात. हेमा मालिनी उत्तर देताना सांगतात, 'या क्लच बॅगमध्ये सर्वसाधारणपणे कॉम्पॅक म्हणजेच एक प्रकारची टच-अप पावडर, लिपस्टिक आणि खूप थोडे पैसे असतात.'त्यावर अमिताभ म्हणतात, की साधारणतः महिला घरातूनच मेक-अप करून बाहेर पडतात; मग या एवढ्या छोट्याशा बॅगमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी ठेवण्याची काय गरज आहे?त्यावर हेमा मालिनी सांगतात, 'मेक-अप केलेला असला, तरी थोड्या थोड्या वेळाने तो टच-अप करत राहावा लागतो. म्हणूनच त्यासाठी लागणारं सगळं साहित्य त्या क्लच बॅगमध्ये बरोबर घेतलेलं असतं.'हेमा मालिनी यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर अमिताभ यांच्यासह रमेश सिप्पी आणि तिथे असलेले सर्वच जण जोरजोराने हसायला लागतात.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC