Home /News /entertainment /

''ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी'' ; अभिनेत्रीचा साधा-सिंपल अंदाज पाहून चाहत्याने थेट घातली लग्नाची मागणी

''ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी'' ; अभिनेत्रीचा साधा-सिंपल अंदाज पाहून चाहत्याने थेट घातली लग्नाची मागणी

ऋतुजा बागवेने निळ्या रंगाच्या साडीमधील तिचा साधा सिंपल तितकाच सुंदर फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला थेट लग्नाची मागणी घातली.

  मुंबई, 14 ऑक्टोबर : मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे (rutuja bagwe )सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे काही फोटो तसेत व्हिडिओ व तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी शेअर करत आहे. सध्या नवरात्रीचेनिमित्त साधत विविध अभिनेत्री नवरात्रीच्या नऊ रंगात विविध फोटोशुट करत आहेत. यानिमित्त ऋतुजा बागवेने (rutuja bagwe latest photos ) देखील निळ्या रंगाच्या साडीमधील तिचा साधा सिंपल तितकाच सुंदर फोटो शेअर केला. हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला थेट लग्नाची मागणी घातली. ऋतुजा बागवेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही साडीमदील सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिने या फोटोत निळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसली आहे. यावर तिने गोल्डन ज्वेलरी परिधान केल्याचे दिसत आहे. या फोटोंमध्येती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तसेच कपाळी निळी टिकली देखील खूप शोभून दिसत आहे. तिता हा साधा सिंपल लुक चाहत्यांना खूपच आवडलेला दिसत आहे. मध्यंतरी तिच्या साडी विथ ट्वीस्ट हा पॅटर्न सोशल मीडियावर खूपच गाजला होता आता तिचा हा साडीतील फोटो चर्चेत आला आहे चाहत्यांकडून या फोटो वर कमेंट यावरचा होत आहे.
  तिच्या एका चाहत्याने या फोटो वर कमेंट करत महटले आहे की, ''तू आणि तुझं हसणं आणि तुझं सुंदर दिसणं. मी आणि माझं तुला पाहणं. हाय ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी लग्न...'' तर आणखी एका चाहत्याने अशीच एक कमेंट केली आहे ती म्हणजे, ''किती ते नखरे'' तर दुसरा चाहता ऋतुजाच्या सौंदर्याची तारीफ करताना दिसतोय. तो म्हणतोय.. ''रूप देखणे बघून नयन हे सुखावले'''..अशा एकापेक्षा एक कमेंट सध्या तिच्या या फोटोला येत आहेत. वाचा : Bigg Boss मराठीच्या घरात पाहायला मिळणार विशाल -सोनालीचा रोमॅंटिक अंदाज, पाहा Photos ऋतुजा ही मराठी चित्रपट क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने आजपर्यंत विविध मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. प्रेक्षकांकडून नेहमी तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. यापूर्वी ऋतुजा बागवेने 'या गोजिरवाण्या घरात'. 'मंगळसूत्र', 'एका लग्नाची तिसरी गोष्ट', 'तू माझा सांगती', 'नांदा सौख्यभरे',' चंद्र आहे साक्षीला', या मराठी मालिकांमध्ये अभिनयाची छाप उमटवली आहे. तसेच तिने .रिस्पेक्ट. आणि 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात देखील काम केले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment, Navratri, TV serials

  पुढील बातम्या