प्रीतीने शेअर केलेल्या फोटोमध्ये शाहरुखने तिला दोन्ही हातांनी उचलून घेतलं आहे. प्रीतीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर असं लक्षात येत की ती जवळजवळ खाली पडणार आहे. तर सलमानला हसणं कंट्रोल होत नाहीये असं दिसतंय. बऱ्याच वर्षांनी प्रीती आणि सलमान यांचा एकत्र फोटो पाहून चाहते भलतेच खुश झालेत. प्रीतीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, थ्रोबॅक, 'हा त्यावेळचा फोटो आहे जेव्हा मला स्वत:ला मजबूत ठेवण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागत नव्हती. हा फोटो माझ्यासाठी फार अमूल्य आहे', असे म्हणत प्रीतीने चाहत्यांना तिच्या या फोटोला कॅप्शन सुचवण्यासाठी सांगितले आहे. प्रीतीच्या पोस्टनंतर चाहत्यांनी फोटोला कॅप्शन सुचवायलाही सुरुवात केली आहे. प्रीती आणि सलमान यांनी 'दिल जो प्यार करेगा', 'जान ए मन', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'मैं और मिसेज खन्ना' यांसारख्या अनेक सिनेमात एकत्र काम केलं आहे. प्रेक्षकांनी देखील दोघांच्या जोडीला खूप प्रेम दिलं. प्रीती झिंटा विषयी बोलायचं झालं तर प्रीती काही महिन्यांपूर्वीच आई झाली आहे. प्रीतीला एक मुलगी असून तिच्यासोबत प्रीती आईपण अनुभवते आहे. लहान मुलीमुळेच यंदा प्रीती आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊ शकली नव्हती.Throwback to a time when I didn’t have to do lots of crunches to have a strong core 😂 Since this picture is so priceless I would love for you guys to caption it 😍 #throwback #funtimes #memories #ting @BeingSalmanKhan pic.twitter.com/kB6Qs909m7
— Preity G Zinta (@realpreityzinta) May 19, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Preity zinta, Salman khan