जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनी 26 वर्षांनी करणार Comeback, मुलासह स्क्रीन करणार शेअर

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनी 26 वर्षांनी करणार Comeback, मुलासह स्क्रीन करणार शेअर

चित्रपट संन्यास घेतल्यानंतर काही दिवसांनी मंदाकिनीने बौद्ध धर्म स्वीकारला. पूर्वायुष्यात बौद्धभिख्खू असणाऱ्या एका बौद्ध अभ्यासकाशी तिने लग्न केलं, अशी माहिती विकीपीडियावर आहे.

चित्रपट संन्यास घेतल्यानंतर काही दिवसांनी मंदाकिनीने बौद्ध धर्म स्वीकारला. पूर्वायुष्यात बौद्धभिख्खू असणाऱ्या एका बौद्ध अभ्यासकाशी तिने लग्न केलं, अशी माहिती विकीपीडियावर आहे.

राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili fame Mandakini) चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीने 1985 मध्ये आपल्या स्टाइलने धमाका केला होता. राजीव कपूरसह कास्ट करण्यात आलेली अभिनेत्री मंदाकिनी पहिल्याच चित्रपटाने रातोरात लोकप्रिय झाली होती

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 19 एप्रिल: राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ (Ram Teri Ganga Maili fame Mandakini) चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीने 1985 मध्ये आपल्या स्टाइलने धमाका केला होता. राजीव कपूरसह कास्ट करण्यात आलेली अभिनेत्री मंदाकिनी पहिल्याच चित्रपटाने रातोरात लोकप्रिय झाली होती. यानंतर मंदाकिनीने ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘कहां है कानून’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बान’, ‘प्यार करके देखो’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मंदाकिनी शेवटचे 1996 मध्ये गोविंदा, आदित्य पांचोली आणि नीलम कोठारी यांच्यासोबत ‘जोरदार’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्राला अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. मुलासह करणार कमबॅक आता 26 वर्षांनंतर मंदाकिनी पुन्हा एकदा दिसणार आहे. मंदाकिनीने मुलगा रबिल ठाकूरसाठी कमबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कमबॅक प्रोजेक्टबद्दल ई-टाइम्सशी बोलताना मंदाकिनी म्हणाली की, साजन अग्रवालसोबत काम करून खूप आनंदी आहे. या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन साजन करत आहेत. हे वाचा- चित्रपटाच्या सेटवर कल्पना न देताच अभिनेत्यानं किस केल्यामुळे रडल्या होत्या रेखा, अभिनेत्रीनं सांगितला किस्सा मंदाकिनी 26 वर्षांनंतर करणार म्युझिक व्हिडिओ मंदाकिनीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘हे गाणे एका आईबद्दल आहे, ज्याचे शीर्षक ‘माँ ओ माँ’ आहे. हे एक अतिशय सुंदर गाणे आहे आणि या गाण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझा मुलगा या म्युझिक व्हिडीओमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या महिन्याच्या अखेरीस आम्ही गाण्याचे शूटिंग सुरू करू.

News18

‘मंदाकिनीसोबत काम करण्याचे स्वप्न झाले साकार’ साजन अग्रवाल यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘मंदाकिनी माझ्या होम टाऊनमधील आहे आणि मंदाकिनीचा मुलगा या म्युझिक व्हिडीओद्वारे डेब्यू करत आहे. मंदाकिनीला दिग्दर्शित करण्याचे माझे स्वप्न देखील पूर्ण होईल’. या गाण्याला बबली हक आणि मीरा यांनी संगीत दिले आहे. ऋषभ गिरी यांनी हे गाणं गायले असून गुरुजी कैलास रायगर यांनी निर्मिती केली आहे. इतकंच नाही तर मंदाकिनीसोबत एक लघुपट दिग्दर्शित करण्याची साजनची इच्छा आहे. हे वाचा- The Kashmir Files आता घरबसल्या पाहाता येणार, वाचा कुठे होणार या सिनेमाचे स्ट्रीमिंग? ‘राम तेरी गंगा मैली’ ठरला होता हिट सिनेमा राज कपूरच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात मंदाकिनीने साडीमध्ये अंघोळ करण्याचा सीन शूट केला होता, या सीनमुळे त्यावेळी गोंधळ उडाला होता. इतरही काही कारणामुळे मंदाकिनी नेहमी चर्चेत राहिली होती. 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनीचे नाव दाऊद इब्राहिमसोबतही जोडले गेले होते. पुढे तिने डॉ. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले आणि ती चित्रपट जगतापासून दूर गेली. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात