मुंबई, 02 एप्रिल- सध्या बॉलिवूडमध्येसुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका पाठोपाठ एक कित्येक सेलिब्रिटी कोरोना बाधित झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मलायका अरोरालासुद्धा (Malaika Arora) कोरोना झाला होता. त्यावर तिने यशस्वीरित्या मात केली. दरम्यान आता मलायकाने कोरोनाची लसही (Malaika Arora take corona vaccine) घेतली आहे. मलायका अरोरानं कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. मलायकानं स्वतः सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. एक एप्रिलपासून 45 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. त्यामुळे 47 वर्षांच्या मलायकानेसुद्धा ही लस घेतली. मलायकाने सोशल मीडियावर लस घेतानाचा फोटो पोस्ट केला आहे. सोबत तिने चाहत्यांसाठी खास संदेशही दिला आहे.
“मी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. कारण आपण या लढ्यात एकत्र आहोत. चला योद्धांनो आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई जिंकायची आहे. तुम्हीसुद्धा लस लवकरात लवकर घ्यायला विसरू नका” असा संदेश तिने आपल्या चाहत्यांना दिला आहे. त्याचबरोबर तिनं कोरोना काळात काम करत असलेल्या सर्व कोरोना योद्धांचे आभारही मानले आहेत. हे वाचा - कोरोनाचा प्रकोप! रुपेरी पडद्यावरील नागिणही झाली COVID-19 ची शिकार मलायका काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. तरीसुद्धा ती नेहमी चर्चेत असते. कधी ती आपल्या कपड्यांमुळे, कधी फिटनेसमुळे तर कधी अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत राहते. मलायका 47 वर्षांची असूनसुद्धा फिटनेसच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींनासुद्धा टक्कर देते. मलायकाला बऱ्याच तरुण ‘स्टाईल आयकॉन’ समजतात. तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला असतो. हे वाचा - ‘बेजबाबदारपणाची हद्दच झाली’, पहिल्या पतीपासून वेगळं होण्याबाबत दियाचा खुलासा सोशल मीडियावर काही लोक मलायकाला तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे कौतुक करतात. तर दुसरीकडे काही लोक तिचं वय आणि तिचा हॉट अंदाज यावरून ट्रोल करत असतात. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलायकाला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. ती आपल्या अंदाजात वावरत असते. मलायका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहे. सतत सोशल मीडियावर आपले हॉट फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर मलायका अभिनेता आणि प्रियकर अर्जुन कपूर सोबत मुंबई मध्ये अनेक ठिकाणी दिसून येते.

)







