Home /News /entertainment /

'बेजबाबदारपणाची हद्दच झाली', पहिल्या पतीपासून वेगळं होण्याबाबत दिया मिर्झाचा मोठा खुलासा

'बेजबाबदारपणाची हद्दच झाली', पहिल्या पतीपासून वेगळं होण्याबाबत दिया मिर्झाचा मोठा खुलासा

पहिला पती साहिल सांघाबात घटस्फोट घेतल्यानंतर रंगणाऱ्या चर्चांना अखेर दिया मिर्झानेच (dia mirza) पूर्णविराम दिला आहे.

    मुंबई, 02 एप्रिल - सध्या आपल्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे दिया मिर्झा (Dia Mirza) होय. दियानं फेब्रुवारीमध्ये वैभव रेखीसोबत लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच दिया गरोदर असल्याच्या ((Dia Mirza Pregnant) चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आणि आता दीड महिन्यांनंतर दियानं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत आपण गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. यापूर्वी दिया चर्चेत होती ते म्हणजे आपला पहिला पती साहिल सांघा याच्यासोबत बिनसलेल्या नात्यामुळे. दिया मिर्झानं स्वतः पहिला पती साहिल सांघा याच्यासोबत विभक्त होत असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी तिनं सोशल मीडियावर पोस्ट देखील केली होती. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. आणि सर्वचजण यापाठीमागे नेमकं काय कारण असेल हा विचार करत होते. बऱ्याच वेळा दिया आणि साहिल यांच्या विभक्त होण्यामागील कारण लेखिका कणिका धिल्लोन असल्याचं म्हटलं जातं होतं. कणिका आणि साहिल यांच्यातील वाढत असलेली जवळीक पाहून दियानं हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. मात्र आता दियाने याला उत्तर देत या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. हे वाचा - Dia Mirza Pregnant : लग्नानंतर दीड महिन्यांतच दिया मिर्झाने दिली GOOD NEWS दियाने आपल्या सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली. दिया म्हणाली, मी आणि साहिलच्या विभक्त होण्यामागे ज्या चर्चा रंगत आहेत त्या म्हणजे एक बेजबाबदारपणाच आहे. आम्ही दोघं होण्याला कुणी तिसरी व्यक्ती कारणीभूत आहे यात काही तथ्य नाही. आमच्या नात्यातील दुराव्यात आमच्या एका महिला कलिगला ओढलं जात आहे आणि खोटं पसरवण्यासाठी एका महिलेच्या नावाचा असा बेजबाबदारपणे वापर होतो आहे, याचं समर्थन मी कधीच करणार नाही. आमच्या नात्यात एखाद्या व्यक्तीला कारण नसताना ओढणं अत्यंत चुकीचं आहे.  आमच्या वैयक्तिक आयुष्याला वैयक्तिक राहू द्या. अशा शब्दांत दियानं आपला रोष व्यक्त केला आहे. हे वाचा - निक्कीनं केला आपल्या लव्ह लाईफचा खुलासा; उत्तर ऐकून टोनी कक्करलाही बसेल धक्का नुकताच दिया मालदीव मध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसून आली होती. यावेळी दिया सोबत दुसरा पती वैभव रेखी आणि सावत्र मुलगीसुद्धा होती. वैभव हा एक मोठा व्यावसायिक आहे. वैभव आणि दिया खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. ते चांगले मित्रसुद्धा होते. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आणि फेब्रुवारीमध्ये या दोघांनी लग्नं केलं आहे .
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Dia mirza

    पुढील बातम्या