मुंबई, 13 एप्रिल : मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा (Gudipadwa). आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वत्र उत्साह दिसत आहे. सर्व लोक सामाजिक भान पाळत स्वतःच्या कुटुंबियांसोबत गुढीपाडवा साजरा करत आहेत. सामान्य लोकांप्रमाणे मोठमोठे कलाकार सुद्धा गुढीपाडवा (Celebrity gudipadwa celebration) साजरा करत. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (bollywood actress) माधुरी दीक्षितनेही (Madhuri dixit) गुढीपाडवा साजरा केला आहे. सध्या सर्वत्र कोरोनाची महासाथ आहे. या परिस्थीतून लवकरात लवकर बाहेर पडावं आणि सामान्य जनजीवन पूर्वपदावर यावं असं प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या परिने प्रार्थना करत आहेत. माधुरीनेसुद्धा कोरोनापासून मुक्ती मिळावी अशी प्रार्थना आजच्या शुभदिनी केली आहे.
तसंच धकधक गर्ल माधुरीने आपल्या बालपणीच्या खास आठवणी सुद्धा ताज्या केल्या आहेत. हे वाचा - OMG! करिश्माची कार्बन कॉपी; फोटो पाहून ओळखणार नाही कोण खरं, कोण डुप्लिकेट टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत गुढीपाडव्याच्या आठवणींबद्दल बोलताना माधुरीने सांगितलं, गुढीपाडवा हा आपला पवित्र सण आहे. यादिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. रत्नागिरीत माझ्या आजी-आजोबांचं घर आहे आणि माझ्या गुढीपाडव्याच्या आठवणीसुद्धा तिथल्याचं आहेत. आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी रत्नागिरीत पोहचत असू आणि आमची गुढीपाडव्याची सुरुवात कोकिळेच्या आवाजाने होतं असे. ज्या शहरात आपला जन्म होतो. आपण ज्या ठिकाणी वावरतो, वाढतो त्या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टी आपल्यासाठी खास असतात. लहानपणी आम्ही आमच्या भावंडासोबत गुढीसाठी काठी शोधायला जायजो. नंतर गुढीला सजवून, साखरेची माळ घालून तिची पूजा करणं, त्या सर्व आठवणी खुपचं सुंदर आहेत, असं माधुरी म्हणाली. हे वाचा - नुसरत जहाँचा इंटरनेटवर धुमाकूळ; निवडणूक संपताच केलं बोल्ड फोटोशूट कोविड 19 मुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रत्येक नागरिक आज कोरोनाशी लढा देत आहे. हा लढा यशस्वी होऊ दे आणि सर्वांना कोरोनापासून लवकरच मुक्ती मिळू दे. हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आरोग्य घेऊन येऊ दे, अशी प्रार्थना माधुरीनं केली आहे. तसंच सर्वांना मास्क वापरण्याची आणि सामाजिक अंतर पाळण्याची विनंतीसुद्धा तिनं केली आहे. सध्या माधुरी टीव्ही वरील ‘डान्स दिवाने’ या कर्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.