OMG! करिश्माची कार्बन कॉपी; फोटो पाहून ओळखणार नाही कोण खरं, कोण डुप्लिकेट
आता यातली खरी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma kapoor) कोण आणि डुप्लिकेट कोण तुम्हीच सांगा.
|
1/ 8
सोशल मीडियावर सतत बॉलिवूड कलाकारांचे डुप्लिकेट दिसून येत असतात. अमिताभ बच्चन, करीना कपूर, अनुष्का शर्मा, मधुबाला नंतर आता अभिनेत्री करिश्मा कपूरची डुप्लिकेट पाहायला मिळत आहे.
2/ 8
सध्या सोशल मीडियावर काही जुने टिकटॉक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये असणारी मुलगी अगदी करिश्मा कपूरसारखी दिसत आहे.
3/ 8
या मुलीचं नाव हिना खान असं आहे. हिना टिकटॉकमुळे प्रसिद्धीस आली होती. त्यात ती हुबेहूब करिश्मासारखी दिसते. करिश्माच्या लूकमध्ये तिच्या गाण्यांवर तिने आपले बरेच व्हिडीओ शेअर केले होते.
4/ 8
मध्यंतरी टिक टॉकवर बंदी आल्यानंतर हिना खान गायब झाली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
5/ 8
हिना सध्या दुसऱ्या माध्यमातून सर्वांच्या समोर येतं आहे. ती आता इन्स्टाग्रामवर आपले व्हिडीओ पोस्ट करत असते.
6/ 8
हिनाला सर्वजण करिश्माची कार्बन कॉपी म्हणतात. तर तिचे चाहते तिला करिश्माच्या गाण्यांवर किंवा डान्सवर व्हिडीओ करण्याची मागणी करतात.
7/ 8
करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील अतिशय प्रसिद्ध अशी अभिनेत्री समजली जातं होती. त्यामुळे आजही चाहते तिला पसंत करतात.
8/ 8
करिश्माच्या या कार्बन कॉपीला बघून अनेक लोक आश्चर्यचकित सुद्धा होतात.