मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Madhuri Dixit ची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट, VIDEO शेअर करत म्हणाली...

Madhuri Dixit ची 'या' व्यक्तीसाठी खास पोस्ट, VIDEO शेअर करत म्हणाली...

माधुरीच्या आयुष्यातील आज महत्त्वाचा दिवस आहे यानिमित्त तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

माधुरीच्या आयुष्यातील आज महत्त्वाचा दिवस आहे यानिमित्त तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

माधुरीच्या आयुष्यातील आज महत्त्वाचा दिवस आहे यानिमित्त तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे.

  मुंबई. 17 ऑक्टोबर: धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आज लग्नाचा 22 वा (22nd anniversary) वाढदिवस सासरा तरत आहे. करिअर ऐन भरात असताना माधुरीने डॉ. नेनेंसोबत लग्न केलं आणि अमेरिकेत संसार थाटला. या दोघांचं बाँडिंग (madhuri dixit and shriram nene) चाहत्यांना नेहमीच कपल गोल्स देत आलं आहे. त्यानंतर माधुरीला दोन मुलं झाली आणि तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा विचार केला. आता माधुरी भारतात एव्हाना बॉलिवू़डमध्ये चांगली स्थिरावली आहे. आज तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे यानिमित्त तिने तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी खास पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. माधुरी आज पती श्रीराम नेनेंसोबत लग्नाचा 22वा वाढदिवस साजरा करते आहे. या खास दिवसानिमित्ताने माधुरीने नवऱ्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टला एकत्र असण्याची जादुई 22 वर्षं हे कॅप्शन देत तिने एक व्हिडीयो शेअर केला आहे. श्रीराम नेनेंसोबत लग्न त्यानंतर मुलं तसेच कुटुंब आणि आता 22 वर्षात मुलांच शिक्षण, संसार आणि करिअर या गोष्टींचा मेळ माधुरीने कसा साधला या सगळ्याचे दर्शन या व्हिडीओमध्ये पाहयला मिळेल. या 22 वर्षातील प्रत्येक क्षण माधुरीच्या या व्हिडीओमध्ये टिपण्यात आला आहे. माधुरीच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  माधुरीने 17 ऑक्टोबर 1999 रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. एकीकडे माधुरी दीक्षित ग्लॅमर इंडस्ट्रीमधून आहे तर दुसरीकडे श्रीराम नेने हे लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. हल्ली नेने काही माधुरीसोबत काही कार्यक्रमात दिसतात. माधुरी आणि श्रीराम नेने यांची जोडी लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे. वाचा-कतरिना कैफसोबतच्या अफेअरवर Vicky Kaushal ने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला... माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत. आरिन आणि रयान अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. आरिननं याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तर रयान 16 वर्षांचा आहे. तिच्या कामाबद्दल सांगयचं तर माधुरी दीक्षित नुकतीच डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने 3 मध्ये दिसली होता. आता लवकरच माधुरी डिजिटल डेब्यूही करणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Madhuri dixit

  पुढील बातम्या