Home /News /entertainment /

सोनू सूद काहीही करू शकतो! विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी गावात थेट बसवला टॉवर

सोनू सूद काहीही करू शकतो! विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी गावात थेट बसवला टॉवर

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. देशातील हजारो व्यक्तींना त्याने कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात (Coronavirus Lockdown) मदत केली आहे. अभिनेत्याकडून मदतीचा ओघ अद्यापही सुरूच आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 06 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांच्या गळ्यातील ताइत बनला आहे. देशातील हजारो व्यक्तींना त्याने कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळात (Coronavirus Lockdown) मदत केली आहे. दरम्यान सोनू सूदने काही दिवसांपूर्वी चंदीगडमधील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी स्मार्टफोनचे वाटप केले होते, मात्र शिक्षणासाठी मुलांची होत असलेली गैरसोय पाहता हरयाणामधील या विद्यार्थ्यांची सोनूने आणखी एक वेगळी मदत करण्याचे ठरवले आहे. त्याने त्याचा मित्र करण गिल्होत्रा (Karan Gilhotra) च्या मदतीने एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी मोरनी गावामध्ये मोबाइल टॉवर इन्स्टॉल केला आहे. इंदूज टॉवर्स आणि एअरटेलची कनेक्टिव्हिटी अखंड सुरू ठेवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोनंतर सोनू सूदने ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मोरनीमधील दापना या गावातील एक विद्यार्थी या फोटोमध्ये झाडाच्या फांदीवर बसून मोबाइल सिग्नल मिळवण्याचा प्रयत्न करत होता, जेणेकरून त्याला त्याचा गृहपाठ पूर्ण करता येईल. या फोटोमध्ये अनेकांनी सोनू सूदला टॅग केले होते. (हे वाचा-कोरोनामुक्त झालेल्या मलायकाचा जबरदस्त कमबॅक) या उपक्रमाबाबत बोलताना सोनू सूद असे म्हणाला की, 'मुलं ही देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी समान संधी मिळणे आवश्यक आहे. मला असे वाटते की, पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी कुणीही अशा आव्हानांमुळे थांबले नाही पाहिजे.  या मुलांना ऑनलाइन क्लासेस घेता यावेत याकरता गावामध्ये मोबाइल टॉवर बांधणे हा माझ्यासाठी एक प्रकारे सन्मान आहे. यानंतर मोबाइल सिग्नलसाठी त्यांना झाडांच्या फांद्यांवर चढावे लागणार नाही.' (हे वाचा-भारतातील बड्या उद्योगपतींच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या अखेर Netflix वर रिलीज) सोनू सूदने लॉकडाऊन काळात अनेकांना मदत केली आहे. सोशल मीडियावर त्याचे कौतुक होतच आहे, मात्र UNDP कडून त्याचा सन्मान करण्यात आला. Special Humanitarian Action Award हा पुरस्कार प्रदान करून सोनूचा सन्मान करण्यात आला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus, Sonu Sood

    पुढील बातम्या