मुंबई, 28 मार्च- : नेटफ्लिक्सवरील 'द बिग बँग थिअरी' ही वेब सिरिज सध्या चर्चेत आहे.या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांची तुलना खूपच खराब पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रकरणी नुकतीच राजकीय विश्लेषक मिथुन विजय कुमार यांनी Netflix ला नोटीस देखील बजावली आहे. आता याप्रकरणावर खासदार जया बच्चन यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
नुकताच बिग बँग थिअरीचा नवीन भाग नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला. पहिल्या सीझनच्या या भागात, जिम पार्सन्सने त्याच्या पात्रात माधुरी आणि ऐश्वर्याची तुलना केली आहे. संवादात तो म्हणतो- ऐश्वर्या राय गरीबांची माधुरी दीक्षित आहे. यानंतर कुणाल नायर म्हणाला की, 'ऐश्वर्या राय ही देवीसारखी होती आणि तिच्या तुलनेत माधुरी दीक्षित ही कुष्ठरोगी वेश्या आहे.
वाचा-VIDEO : गौरव मोरेचा थेट खासदारासोबत डान्स, 'वन-टू- का फोर'वर नादखुळ स्टेप्स
जया बच्चन यांनी व्यक्त केला संताप
कुणाल नय्यरच्या 'लेपरस प्रोस्टिट्युट' या वक्तव्यामुळे केवळ अभिनेत्रीच नाही तर तिचे सर्व चाहते आणि बॉलिवूड करांकानी देखील यावर संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी जया बच्चन यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.जया बच्चन म्हणाल्या की, हा मुलगा म्हणजेच कुणाल नय्यर लहान आहे का? अतिशय वाईट भाषा वापरली आहे. त्याला वेड्याच्या दवाखान्यात पाठवलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबीयांनीही सांगायला हवं की, हे शब्द ऐकून त्यांना कसं वाटतंय? अशा तिखट शब्दात जया बच्चन यांनी कुणाला नय्यरचा समाचार घेतला आहे.
बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने या प्रकरणावर संताप व्यक्त केला
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर मत व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, मी अजून हा शो पाहिला नाही. पण असा आक्षेपार्ह शब्द वापरला गेला असेल तर त्यातून लोकांची घाणेरडी मानसिकता दिसून येते. त्यांना काय वाटतं हा विनोद आहें. बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सने या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे.
मिथुन विजय कुमार यांनी या प्रकरणी Netflix ला नोटीस बजावली आहे. एवढंच नाही तर नेटफ्लिक्सने हा भाग हटवावा अशीही मागणी देखील त्यांनी केली आहे. त्यांनी याप्रकरणी ट्वीट देखील केलं आहे. मिथुन विजय कुमार यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, काही दिवसांपूर्वी मी नेटफ्लिक्सवर बिग बँग थिअरी या शोचा एक भाग पाहिला. यामधला एक अभिनेता दिग्गज अभिनेत्री माधुरी दीक्षित बाबत बोलताना आक्षेपार्ह आणि अपमानास्पद शब्द वापरतो. मी लहानपणापासूनच माधुरी दीक्षित यांचा फॅन आहे. त्यामुळे बिग बँग थिअरीमधली ती कमेंट ऐकून मला वाईट वाटलं. भारतीय संस्कृती आणि स्त्रिया यांचा अपमान झाल्याची भावना माझ्या मनात आली. त्यामुळेच मी माझ्या वकिलामार्फत नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यास सांगितलं. तसंच मी नेटफ्लिक्सला हा भाग काढून टाकण्याचीही विनंती केली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जाईल अशी अपेक्षा असल्याचे त्यानं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aishwarya rai, Bollywood News, Entertainment, Madhuri dixit