मुंबई, 28 मार्च- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम या कार्यक्रमामुळे गौरव मोरे हे नाव घराघरांत पोहचलं आहे. फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणार गौरव आता मराठी चित्रपटांमध्येही गौरव काम करताना दिसत आहे. गौरव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये खासदार सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे वन-टू- का फोर’ या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत. शिर्डीत नुकत्याच पार पडलेल्या महापशुधन एक्स्पोच्या निमित्ताने शेतकरी बांधवांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काही नेत्यांनी तसेच कलाकारांनी देखील हजेरी लावली. गायक सुदेश भोसले यांनी या कार्यक्रमात काही गाणी गाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यावेळी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि अभिनेता गौरव मोरेहे स्टेजवर उपस्थित होते. सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांनी या कार्यक्रमात ‘वन-टू- का फोर’ या गाण्यावर डान्स नादखुळा असा डान्स केला आहे. वाचा- 75 व्या वर्षी अभिनेत्री गाळतेय जीममध्ये घाम; वर्कआउट VIDEO व्हायरल गौरव मोरेनं त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. महापशुधन एक़स्पो 2023 शिर्डी खासदार डॉ.सुजय विखे पाटील साहेब हयांच्या सोबत एक ख़ास क्षण… @drsujayvikhe सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफाना व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील गौरवचे कौतुक केलं आहे.
गौरव मोरेने दुसरी एक पोस्ट केली आहे व सोबत व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये गौरव आणि सुदेश भोसले हे डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला गौरवनं कॅप्शन दिलं, शिर्डी महोत्सव 2023 ज्यांना बघुन आपण मोठे झालो. आपल जेवढं वय आहे तेवढा अनुभव असलेले सुधेश सर यांच्यासोबत मंच शेयर करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो.
अभिनेता गौरव मोरे हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेच्या माध्यमातून गौरवने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील गौरव मोरे याच्यासोबतच समीर चौघुले , विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, दत्तू मोरे,प्रसाद खांडेकर आणि वनिता खरात या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.