लग्नाआधी देशमुखांच्या सुनेला करिअरविषयी ऐकावी लागली होती बोलणी, जेनेलियाने स्वत: केला खुलासा

लग्नाआधी देशमुखांच्या सुनेला करिअरविषयी ऐकावी लागली होती बोलणी, जेनेलियाने स्वत: केला खुलासा

बॉलिवूडबरोबरच दाक्षिणात्य सिनेमात तिच्या अभिनयाने छाप सोडणारी अभिनेत्री जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर: प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत विलासराव देशमुख यांची सून जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh)  बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही आहे. मात्र बॉलिवूड आणि दाक्षिणात्य  सिनेमांमध्ये  तिने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अभिनेता रितेश देशमुखशी (Riteish Deshmukh) लग्न केल्यानंतर ती कॅमेऱ्यासमोर क्वचितच आढळून आली आहे. तिने काही सिनेमांमध्ये कॅमिओ जरूर केला आहे, मात्र मुख्य भूमिकेत ती दिसली नाही आहे.

दरम्यान अभिनेत्रीचा 'इट्स माय लाइफ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जेनेलियाचा इट्स माय लाइफ हा सिनेमा 2007 मध्ये शूट झाला आहे. सिनेमागृहं किंवा ओटीटीवर प्रदर्शित न होता, तो थेट टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या प्रोजेक्टबाबत  बोलताना जेनेलियाने तिच्या लेटेस्ट मुलाखतीमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही भाष्य केले आहे. जेनेलियाला तिच्या लग्नाच्या वेळी करिअर संदर्भात एक मोठा निर्णय घ्याला लागला होता, याबाबत जेनेलियाने माहिती दिली आहे.

(हे वाचा-नीतू कपूर यांनी शेअर केला कोरोना चाचणीचा VIDEO, डिलिट करावी लागली पोस्ट कारण...)

जेनेलियाने लग्नानंतर तिच्या कुटुंबाबरोबर दीर्घकाळ घालवला आहे. आता ती पुन्हा एकदा काम करण्यास तयार आहे. पिंकविलाशी केलेल्या संभाषणात तिने असे म्हटले आहे की, 'मला त्याआधी खूप काम  करावं लागलं. लोकांनी मला हिंदी सिनेमात फार पाहिलं नाही आहे, पण दाक्षिणात्य सिनेमात पाहिलं आहे. मी खरंच 365 दिवस काम करत होते आणि मला असं वाटलं की मी ब्रेक घेतला पाहिजे.'

(हे वाचा-'तो देखील 'स्टार किड' आहे', संजय दत्तच्या भेटीनंतर नेटिझन्सनी कंगनाला केलं ट्रोल)

जेनेलिया पुढे असं म्हणाली की, तिचं कुटुंब हिच तिच्यासाठी प्राथमिकता आहे आणि त्यानंतर तिला मुलांचा सांभाळ देखील करायचा होता. जेनेलियाने असं म्हटलं की, जेव्हा तिचं लग्न होणार होतं तेव्हा अनेक लोकांनी तिला असं म्हटलं होतं की तिचं करिअर संपलं आहे, मात्र या गोष्टीमुळे ती कधी थांबली नाही. ती असं म्हणाली की, 'जेव्हा माझं लग्न होत होतं तेव्हा लोकं मला म्हणायचे- ओह तू आता लग्न करते आहेस, एका मुलीसाठी करिअर संपुष्टात येतं. मी तेव्हा त्यांचं ऐकून घेतलं आणि निश्चित केलं की, मला लग्न करण्यापासून कुणी थांबवू शकत नाही, कारण मला लग्न करायचं होतं.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 27, 2020, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading