जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नीतू कपूर यांनी शेअर केला कोरोना चाचणीचा VIDEO, डिलिट करावी लागली पोस्ट कारण...

नीतू कपूर यांनी शेअर केला कोरोना चाचणीचा VIDEO, डिलिट करावी लागली पोस्ट कारण...

नीतू कपूर यांनी शेअर केला कोरोना चाचणीचा VIDEO, डिलिट करावी लागली पोस्ट कारण...

अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमुळे त्यांना ट्रोलिंगची शिकार व्हावे लागत आहे. कोरोना टेस्ट करतानाचा हा त्यांच्या व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 नोव्हेंबर: बॉलिवूडमधील (Bollywood) दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी धर्मा प्रोडक्शनचा (Dharma Production) सिनेमा ‘जुग जुग जियो’ (Jug Jug Jiyo) चे शूटिंग सुरू केले आहे. अलीकडेच नीतू सिनेमाच्या सेटवर पोहोचल्या. यावेळी नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर सेटवरील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये एक व्हिडीओ असा देखील होता की, त्या कोरोना चाचणी (Neetu Kapoor COVID-19 Test) करत आहेत. यामध्ये स्वॅब टेस्ट घेतली जात आहे. नीतू कपूर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला मात्र त्यावर चाहत्यांच्या अजब प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी नीतू कपूर यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत. इन्स्टाग्रामवर नीतू कपूर याच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्स आल्या होत्या. ज्यामुळे नीतू यांनी तो व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवर डिलिट केला. काही युजर्सनी नीतू कपूर यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या पद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत. युजर्सच्या मते अशाप्रकारे कोरोना टेस्ट करणं ही योग्य पद्धत नाही आहे. दरम्यान सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने (Viral Bhayani) हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यावर कमेंट्स येण्यास सुरुवात झाली आहे.

जाहिरात

(हे वाचा- साडी नेसूनही पुश अप्स शक्य! अभिनेत्रीचा VIDEO पाहून चाहते म्हणाले, Wonder Woman) कोरोना चाचणीवर एका युजरने आश्चर्य व्यक्त केले आहे- ‘कोरोना चाचणी करण्याचा हा योग्य मार्ग नाही !!! स्वॅब घेताना नाकामध्ये खूप आतवर जावे लागते आणि 30 सेकंदासाठी त्याठिकाणी रोटेट करावे लागते !!! अर्थात ही पद्धत चुकीची आहे आणि त्यामुळे चाचणी निगेटिव्हच येईल.’ यापूर्वी देखील अनेक कलाकारांनी त्यांच्या कोरोना टेस्टचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात