मुंबई, 27 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आज पुन्हा एकदा हेडलाइनमध्ये आहे. बीएमसी विरुद्ध कंगना असा वाद पुन्हा एकदा रंगला आहे. दरम्यान आणखी एका कारणासाठी अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. कंगना रणौत अभिनेता संजय दत्तच्या (Sanjay Dutt) भेटीमुळे सोशल मीडियावर (Social Media) ट्रोल होते आहे. अभिनेत्रीने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती नुकत्याच मोठ्या आजारपणातून बाहेर आलेल्या संजय दत्त (Sanjay Dutt) बरोबर दिसते आहे. कंगनाने संजय दत्त बरोबर फोटो शेअर करताना असं म्हटलं आहे की, ‘जेव्हा मला कळलं की आम्ही हैदराबादमध्ये एकाच हॉटेललमध्ये राहत होतो, तेव्हा त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी सकाळी संजू सरांना भेटायला गेले. त्यांना आधीपेक्षा जास्त हँडसम आणि निरोगी पाहून मला सुखद आश्चर्य वाटलं. आम्ही तुमच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.’
When I got to know we were staying in the same hotel in Hydrabad, I went to see Sanju sir this morning to check on his health and was pleasantly surprised to see him look even more handsome and healthy. We pray for your long life and good health 🥰 pic.twitter.com/VPB5reGThp
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 27, 2020
कंगनाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तो देखील स्टार किड आहे किंवा नेपोटिझमचं प्रोडक्ट आहे, अशा शब्दात नेटिझन्सनी तिला सुनावलं आहे.
Bas ye nahi karna tha baby,aisi kya majboori aa gayi
— Adv.Dr.DG Chaiwala(C.A) (@RetardedHurt) November 27, 2020
Seriously...After all the way u bursted on them and going and meeting them....hypocrisy
— Aditya (@adityaveeren) November 27, 2020
U met with lord of drugs...
— Deewaker Pandey🇮🇳 (@ScorpionHere) November 27, 2020
कंगना हैदराबादमध्ये तिचा बहुचर्चित आगामी सिनेमा ‘थलायवी’चं शूटिंग करत आहे. यामध्ये ती जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे तिच्या ‘धाकड’ या सिनेमाचे शूटिंग देखील हैदराबादमध्ये सुरू आहे. संजय दत्तच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो केजीएफ 2 मध्ये दिसणार आहे. (हे वाचा- नीतू कपूर यांनी शेअर केला कोरोना चाचणीचा VIDEO, डिलिट करावी लागली पोस्ट कारण… ) दरम्यान आज आणखी एका कारणासाठी कंगना चर्चेत आली आहे. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने (bombay high court) मुंबई पालिकेचा (mumbai municipal corporation) निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. कंगनाने न्यायालयाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केले आहे.