मुंबई, 20 जानेवारी: आई होणं हा प्रत्येकच स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. मग ते तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोक असो किंवा बॉलिवूडमधील स्टार्स! बॉलिवूडच्या तारकांपैकी कोणी आपली प्रेग्नन्सी आणि आपल्या बाळांना त्यांच्या फॅन्सपासून दूर ठेवत असतं. तर काहीजण आपला प्रत्येक अनुभव चाहत्यांसोबत शेअर करतात. तुम्हाला ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातील ‘लारा’ अर्थात एव्हलिन शर्मा आठवत असेलच. एव्हलिनने नोव्हेंबर 21 मध्ये बाळाला जन्म दिला. ती सध्या तिच्या मुलीसोबत आनंदात आहे आणि मातृत्वाचा आनंद लुटत आहे. तिने अलीकडेच आपल्या बाळासोबत एक फोटो इंटरनेटवर शेअर केला आणि त्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एव्हलिनने तुषान भिंडीसोबत लग्न केलं. लग्नानंतर ती अभिनयापासून दूर गेली असली तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांना भेटत असते. एव्हलिन मागच्याच वर्षी, नोव्हेंबर 2021 मध्ये आई झाली. तिने आणि तुषानने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. एव्हलिनने काही दिवसांपूर्वी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली होती. एव्हलिनने लिहिलं की, ‘असं म्हणतात की आपल्या आयुष्यात बाळ आल्यावर आयुष्य पूर्णपणे बदलून जातं आणि खरंच दोन महिन्यांपूर्वी इवाच्या आगमनापासून आमचं आयुष्य बदललं आहे!’ हे वाचा- आलिया भट्टने पोस्ट केले Cute Photos, पण फोटोंपक्षा चर्चा अर्जुन कपूरच्या कमेंटची दरम्यान तिने आत्ता शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये लहान एवा आपल्या आईच्या शेजारी झोपून स्तनपान करताना दिसते आहे. या फोटोला एव्हलिनने, ‘तुम्हाला वाटेल की आता तुमची एक दिनचर्या सुरु झाली आहे, आणि तेव्हाच ती #clusterfeeding सुरु करते’, असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये एवा स्तनपान करते आहे, तर एव्हलिन फोटोमध्ये प्रचंड खूश दिसते आहे.
इंटरनेटवर सध्या याच फोटोची चर्चा होताना दिसते आहे. एव्हलिनच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोचे मनापासून स्वागत केले आहे. या फोटोवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. त्यात सगळेच एव्हलिनचे कौतुक करताना दिसतायत. पण काही लोकांनी आपल्या खासगी गोष्टी अशा सोशल मीडियावर टाकू नकोस असं म्हणत एव्हलिनला ट्रोल देखील केलं आहे. एकानी लिहिलंय, ‘असे फोटो शेअर करण्याची काय गरज आहे.’ दुसऱ्या ट्रोलरनी म्हटलंय, ‘ताई, घरातल्या म्हणजे खासगी गोष्टी बाहेर अशा पसरू देऊ नकोस.’ तिसऱ्या यूजरनी म्हटलंय, ‘मातृत्वातला हा सर्वांत विशेष असा अनुभव आहे.’ एका यूजरने एवा खूप क्यूट दिसते आहे असंही म्हटलंय. हे वाचा- रविनाची मुलगीही आहे ग्लॅमरस, फॅशनबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर कामाबद्दल बोलायचं झालं तर एव्हलिनने आपल्या बॉलीवूडमधील कारकिर्दीची सुरुवात 2012 साली ‘सिडनी विथ लव्ह’या चित्रपटाद्वारे केली. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती अयान मुखर्जीच्या ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातून. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांचा हा सुपरहिट सिनेमा होता. एव्हलिनने 15 मे 2021 ला तुषानसोबत लग्न केलं. लग्नानंतर मात्र ती बॉलिवूडपासून दूर राहिली आहे.