Home /News /entertainment /

Raveena Tondon ची धाकटी मुलगीही आहे ग्लॅमरस, फॅशनबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

Raveena Tondon ची धाकटी मुलगीही आहे ग्लॅमरस, फॅशनबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर

रवीनाच्या सर्वांत लहान मुलीचं नाव राशा थडानी (Rasha Thadani) असून सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवुड अभिनेत्रींनाही टक्कर देऊ शकते.

मुंबई, 20 जानेवारी: बॉलिवूड कलाकारांसोबतच त्यांची मुलं-मुली देखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. बॉलिवुड स्टार्सची (Bollywood Stars) मुलं काय शिकतात? कुठे शिकतात? कुठल्या पार्टीला गेले? कुणाला डेट करत आहेत? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा सर्रास प्रयत्न केला जातो. लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या स्टार किड्समध्ये अभिनेत्री रवीना टंडनच्या मुलींचाही (Raveena Tandon Daughters) समावेश होतो. 1991मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी रवीना एकूण चार मुलांची आई आहे. तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे. यातील मोठ्या दोन मुलींना रवीनानं दत्तक घेतलेलं आहे तर एका मुलीला तिनं लग्नानंतर जन्म दिला आहे. तिच्या तिन्ही मुली आपल्या आईप्रमाणंच सुंदर आहेत. आज रवीना टंडनचा 48वा वाढदिवस आहे. या निमित्त तिच्या सर्वात लहान मुलीबद्दल जाणून घेऊया. रवीनाच्या सर्वांत लहान मुलीचं नाव राशा थडानी (Rasha Thadani) असून सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवुड अभिनेत्रींनाही टक्कर देऊ शकते.
View this post on Instagram

A post shared by Rasha (@rashathadani)

16 मार्च 2005 रोजी जन्मलेली राशा 16 वर्षांची आहे. आपल्या टीनेजमध्ये असलेली राशा आपल्या आईप्रमाणेच ग्लॅमरस, स्टायलिश, हॉट दिसते. राशा सोशल मीडियावर (Social Media) सक्रीय असून ती सतत इन्स्टाग्रामवर (Instagram) आपले फोटो शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर 110K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. सौंदर्याच्या बाबतीत ती इतर अनेक स्टार किड्सना टक्कर देते. मग ती शाहरुख खानची मुलगी सुहाना खान असो किंवा अजय देवगणची मुलगी न्यासा.
सुंदर असण्यासोबतच राशा टॅलेंटेडदेखील आहे. काही दिवसांपूर्वी आई रवीनानं इन्स्टाग्रामवर राशाचं रिपोर्ट कार्ड (Marksheet) शेअर केलं होतं. त्यानुसार राशाला वर्ल्ड लिटरेचर, जिओग्राफी, हिस्ट्री, इंग्लिश लँग्वेज, फिजिकल एज्युकेशन आणि ग्लोबल पर्सपेक्टिव्ह या विषयांमध्ये 'ए' ग्रेड मिळाली होती. अभ्यासाव्यतिरिक्त एक्स्ट्राकरिक्युलर अॅक्टिव्हिटीमध्येही (Extracurricular activities) राशा अतिशय चांगली आहे. राशाला तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट (Taekwondo Black Belt) मिळालेला आहे. रवीनानं स्वतः राशासोबतचा एक फोटो पोस्ट करून याची माहिती दिली होती. याशिवाय तिला गायनाचीही आवड आहे. काही दिवसांपूर्वी गाणं गातानाचा आपला एक व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. तिला कीबोर्डसुद्धा वाजवता येतो. राशाला फोटोग्राफीचीही (Photography) आवड असून नुकतीच तिनं आपली वाईल्ड लाईफ फोटोग्राफी शेअर केली. हे वाचा-VIDEO पुष्पा नाव ऐकून गुलाबाच फुल वाटलो काय...Pushpa चा मराठमोळं व्हर्जन रवीनानं 1995 साली वयाच्या 21व्या वर्षी पूजा आणि छाया या दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यावेळी दोन्ही मुली अनुक्रमे 11 आणि आठ वर्षांच्या होत्या. यानंतर, 22 फेब्रुवारी 2004 रोजी रवीनानं अनिल थडानींशी (Anil Thadani) लग्न केलं. त्यांना राशा आणि रणबीरवर्धन नावाची दोन मुलं आहेत. म्हणजेच रवीना एकूण चार मुलांची आई आहे. गंमत म्हणजे तिच्या सर्वात मोठ्या मुलीचं लग्नदेखील झालं असून रवीना आजी झालेली आहे. सध्या रवीनापेक्षा जास्त चर्चा तिच्या मुलीची आहे. येत्या काळात राशानं बॉलिवुडमध्ये पदार्पण केलं तर ती इतर अभिनेंत्रींसमोर मोठं आव्हान उभं करू शकते, असं म्हटलं जात आहे.
First published:

Tags: Bollywood, Bollywood actress

पुढील बातम्या